S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • 'मुक्ता सन्माना'ने 'लेडी दबंग' शिल्पा ठोकडे यांचा गौरव
  • 'मुक्ता सन्माना'ने 'लेडी दबंग' शिल्पा ठोकडे यांचा गौरव

    Published On: Mar 8, 2013 12:59 PM IST | Updated On: Mar 8, 2013 12:59 PM IST

    08 मार्चआयबीएन लोकमतनं वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांसाठी काम करणार्‍या आणि कर्तृत्व गाजवणार्‍या व्यक्तिमत्वांचा मुक्ता सन्मान देऊन गौरव केला. त्यावेळी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वाळू तस्करांवर कारवाई करणार्‍या दक्षिण सोलापूरच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना सन्मानित करण्यात आलं. रात्री-अपरात्री भीमेच्या खोर्‍यात धाडसान कारवाईचा धडाका आणि या कारवाईतून सरकारला आतापर्यंत 64 लाखांचा मिळालेला महसूल..ही कामगिरी आहे. दक्षिण सोलापूरच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची... त्यांनी केलेल्या कारवाईनं वाऴू माफियांच्या पायाखालची वाऴूच सरकरली. आतापर्यंत वाळू वाहतूक करणार्‍या 120 ट्रक्सवर कारवाई, 144 जणांना तुरुंगाची हवा खायला शिल्पा ठोकडे यांनी भाग पाडलंय. मुळच्या सोलापूरच्या असलेल्या शिल्पा ठोकडे यांनी बी एस एस्सीपर्यंत शिक्षण घेतलं. 1999 मध्ये त्यांची पीएसआय म्हणून निवड झाली. यानंतर 1999 ते 2002 पर्यंत मुंबईत त्यांनी पोलीस उपनिरिक्षक म्हणूनही काम पाहिलं. तर कोल्हापुरामध्ये शहर पुरवठा अधिकारी आणि जिल्हा करमणूक अधिकारी पदावर काम करताना त्यांनी अनेक अवैध धंद्यांना आळा घातला.म्हणूनच आज त्या ओळखल्या जातात लेडी दबंग..

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close