S M L
  • कोणत्याही फाईली जळाल्या नाहीत -फौजिया खान

    Published On: Mar 9, 2013 12:25 PM IST | Updated On: Mar 9, 2013 12:25 PM IST

    09 मार्चमी स्वत: तिथे होते. काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली आणि आग ताबडतोब आटोक्यात आणली. ज्या ठिकाणी ही आग लागली त्या ठिकाणी नुतनीकरणाचे काम सुरू होते त्यामुळे कोणत्याही फाईली जळाल्या नाहीत अशी माहिती राज्यमंत्री फौजिया खान यांनी दिली. मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या चौथ्या मजल्यावर लागलेली आग आता आटोक्यात आली आहे. आगीत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. पण आग लागण्याची वर्षभरातली ही दुसरी घटना आहे. चौथ्या मजल्यावर नूतनीकरणाचं काम सुरू आहे. तिथं लावलेल्या केमिकलमुळे ही आग लागल्याचा अंदाज राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close