S M L
  • 'सोबत येतील त्यांना सोबत घेऊ'

    Published On: Mar 9, 2013 04:08 PM IST | Updated On: Mar 9, 2013 04:08 PM IST

    09 मार्चअमरावती : जे सोबत येतील त्यांना घेऊ आणि जे येणार नाहीत, त्यांना गाडून पुढे जाऊ असं ठणकावत आपण महाराष्ट्रावर भगवा फडकवणारच असा निर्धार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. तसंच राहुल गांधी मुंबईत येऊन गेले, मग त्यांनी दुष्काळग्रस्त भागाला आणि भंडार्‍यात तीन अल्पवयीन मुलींची बलात्कार करून हत्या करण्यात आली त्यांच्या कुटुंबीयांना भेट का दिली नाही, असा सवालही त्यांनी विचारला. तसंच सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी जर चितळेंना अतिरिक्त अधिकार दिले नसतील तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी दिला. याचबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार तोंडसुख घेतलं. आज अमरावतीमध्ये शिवसेनेची निषेध सभा पार पडली. या सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सत्ताधार्‍यांवर जोरदार टीका केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close