S M L
  • 'राज ठाकरेंकडून फक्त मनोरंजन'

    Published On: Mar 11, 2013 04:34 PM IST | Updated On: Mar 11, 2013 04:34 PM IST

    11 मार्चहे जे सगळे चालू आहे यामध्ये जनतेची प्रश्न कुठे आहे. दुष्काळाचे प्रश्न,शेतकर्‍यांचे प्रश्न कुठे आहे. दुष्काळग्रस्तांच्या वाट्याला काय येत आहे ? आता काही लोकांचे मस्त मनोरंजन सुरू आहे. मनोरंजनासाठी तमाशा,नाटक आहेत पण राजकीय पक्षांकडून माझ्या प्रश्नाची सोडवून कोण करतंय याकडे जनता लक्ष देऊन आहे अशी अप्रत्यक्ष टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता केली. राज ठाकरेंनी महायुतीत जाणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर शिवसेना आणि भाजपनं आपली रणनीती पुन्हा एकदा आखायला सुरूवात केली आहे. सेना-भाजपच्या आमदारांची आज संध्याकाळी मुंबईत बैठक झाली. यावेळी दोन्ही पक्षांमध्ये कोणतेही वाद नाहीत, असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. युती लोकांसाठी रस्त्यावर उतरेल, लोकांच्या प्रश्नांवर संघर्ष करेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर त्यांनी नाव न घेता टीकाही केली. मनोरंजनासाठी जसे नाटक, चित्रपट असतात तसंच हे चाललंय अशी अप्रत्यक्ष टीका यावेळी उद्धव यांनी राज ठाकरेंवर केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close