S M L

परभणीत पिसाळलेल्या वानराचा उच्छाद

पंकज क्षिरसागर, परभणी 28 फेब्रुवारीपरभणी जिल्ह्यातल्या 5 हजार लोकवस्तीचं टाकळी कुंभकर्ण गाव एका वानराच्या दहशतीखाली जगतंय. पिसाळलेल्या या वानराने अनेक जणांचा चावा घेतला आहे. या वानराला आवर कसा घालायचा हा प्रश्न गावकर्‍यांना पडला आहे. गावकरी सुखाबाई म्हणतात, चार दिवस झाले शेतात जाता येत नाही. शेतात जायला भिती वाटते. ही दहशत आहे एका पिसाळलेल्या वानराची. टाकळी कुंभकर्ण गावात पिसाळलेलं वानर दिसेल त्याच्यावर हल्ला करत सुटले आहे. वानराच्या दहशतीनं भरदिवसा गावातील रस्ते असे ओस पडलेले असतात. पिसाळलेल्या वानरानं आतापर्यंत 6 जणांना जखमी केलंय. वानराच्या उच्छादामुळे गावातील शाळा बंद ठेवण्याची वेळ आलीय तर लोक शेतावर जायलाही घाबरत आहेत. गावकर्‍यानी वनविभागाकडे तक्रार केली मात्र अजूनपर्यंत दखल घेतली नसल्याचा गावकर्‍यांच म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 28, 2012 01:06 PM IST

परभणीत पिसाळलेल्या वानराचा उच्छाद

पंकज क्षिरसागर, परभणी

28 फेब्रुवारी

परभणी जिल्ह्यातल्या 5 हजार लोकवस्तीचं टाकळी कुंभकर्ण गाव एका वानराच्या दहशतीखाली जगतंय. पिसाळलेल्या या वानराने अनेक जणांचा चावा घेतला आहे. या वानराला आवर कसा घालायचा हा प्रश्न गावकर्‍यांना पडला आहे.

गावकरी सुखाबाई म्हणतात, चार दिवस झाले शेतात जाता येत नाही. शेतात जायला भिती वाटते. ही दहशत आहे एका पिसाळलेल्या वानराची. टाकळी कुंभकर्ण गावात पिसाळलेलं वानर दिसेल त्याच्यावर हल्ला करत सुटले आहे. वानराच्या दहशतीनं भरदिवसा गावातील रस्ते असे ओस पडलेले असतात. पिसाळलेल्या वानरानं आतापर्यंत 6 जणांना जखमी केलंय. वानराच्या उच्छादामुळे गावातील शाळा बंद ठेवण्याची वेळ आलीय तर लोक शेतावर जायलाही घाबरत आहेत. गावकर्‍यानी वनविभागाकडे तक्रार केली मात्र अजूनपर्यंत दखल घेतली नसल्याचा गावकर्‍यांच म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 28, 2012 01:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close