S M L

भंडारा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न ?

14 मार्चभंडारा : येथील तीन अल्पवयीन मुलींच्या हत्येचं प्रकरण दिवसेंदिवस गूढ होत चाललंय. या मुलींचा मृत्यू कशामुळे झाला, यावर आलेल्या डॉक्टरांच्या वेगवेगळ्या रिपोर्टमुळे प्रकरणाचा गुंता वाढला आहे. त्यामुळे हे प्रकरणच दडपण्याचा प्रयत्न होतोय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. मुलींच्या मृत्यूनंतर लगेच करण्यात आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये या तिन्ही अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांचा खून करण्यात आल्याचं म्हटलं होतं. पण, त्यानंतरच्या फॉरेंसिक रिपोर्टमध्ये मात्र मुलींवर बलात्कार झाला नाही. आणि इतकंच नाही तर या मुलींचा मृत्यू हा विहिरीत बुडून झाल्याचं म्हटलं होतं. पण, हा रिपोर्ट खोटा असल्याचा आरोप भंडार्‍याचे आमदार नाना पटोले यांनी केला आहे. हे प्रकरण कसं दडपण्याचा प्रयत्न होतोय, याचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तर पोस्टमॉर्टेम तज्ज्ञांनीही बलात्कार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असं सांगितलं आहे. भंडारा बलात्कार प्रकरणाच्या तपासावरुन काही प्रश्न ?1. पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार बलात्कार झाल्याचं स्पष्ट, मग फॉरेन्सिक रिपोर्ट वेगळा कसा ?2. पोस्टमॉर्टेम आणि फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये तफावत कशी ?3. तपासात पोलिसांवर दबाव येतोय का ?4. आरोपी सापडत नसल्यानं प्रकरणच दाबण्याचा प्रयत्न होतोय का ?

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2013 10:41 AM IST

भंडारा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न ?

14 मार्च

भंडारा : येथील तीन अल्पवयीन मुलींच्या हत्येचं प्रकरण दिवसेंदिवस गूढ होत चाललंय. या मुलींचा मृत्यू कशामुळे झाला, यावर आलेल्या डॉक्टरांच्या वेगवेगळ्या रिपोर्टमुळे प्रकरणाचा गुंता वाढला आहे. त्यामुळे हे प्रकरणच दडपण्याचा प्रयत्न होतोय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. मुलींच्या मृत्यूनंतर लगेच करण्यात आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये या तिन्ही अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांचा खून करण्यात आल्याचं म्हटलं होतं. पण, त्यानंतरच्या फॉरेंसिक रिपोर्टमध्ये मात्र मुलींवर बलात्कार झाला नाही. आणि इतकंच नाही तर या मुलींचा मृत्यू हा विहिरीत बुडून झाल्याचं म्हटलं होतं. पण, हा रिपोर्ट खोटा असल्याचा आरोप भंडार्‍याचे आमदार नाना पटोले यांनी केला आहे. हे प्रकरण कसं दडपण्याचा प्रयत्न होतोय, याचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तर पोस्टमॉर्टेम तज्ज्ञांनीही बलात्कार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असं सांगितलं आहे.

भंडारा बलात्कार प्रकरणाच्या तपासावरुन काही प्रश्न ?

1. पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार बलात्कार झाल्याचं स्पष्ट, मग फॉरेन्सिक रिपोर्ट वेगळा कसा ?2. पोस्टमॉर्टेम आणि फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये तफावत कशी ?3. तपासात पोलिसांवर दबाव येतोय का ?4. आरोपी सापडत नसल्यानं प्रकरणच दाबण्याचा प्रयत्न होतोय का ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2013 10:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close