S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • दहावी पास करण्यासाठी बापाने मोडला मुलाचा हात
  • दहावी पास करण्यासाठी बापाने मोडला मुलाचा हात

    Published On: Mar 15, 2013 11:58 AM IST | Updated On: Mar 15, 2013 11:58 AM IST

    15 मार्चआपल्या पाल्यासाठी पालक काय करू शकतात याचा नेम नाही. सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहे. एका मुख्याध्यापक पालकाने आपल्या मुलाला दहावी पास करण्यासाठी चक्क त्याचा हात मोडल्याचं दाखवलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या अथुने गावात हा प्रकार घडलाय. इथल्या छत्रपती विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तमकुमार वाघ यांचा मुलगा अक्षय यंदा 10वीत आहे. पण मुलगा पास होणार नाही, या भीतीनं मुख्याध्यापकांनी चक्क त्याचा हात मोडल्याचा बनावट प्रमाणपत्र शाळेत दिलं आणि मुलासाठी रायटरची सोय केली. ज्या डॉक्टरनं हे प्रमाणपत्र दिलं त्यानीच मुलाला काहीही झालेलं नाही, असं सांगितलं आहे. त्यामुळे मुख्याध्यापक चांगलेच अडचणीत सापडले आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close