S M L

'बाबा-दादांच्या जेवणासाठी 100 कोटींचे टेंडर'

15 मार्चमुंबई : राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारी निवासस्थानांसाठी मात्र 100 कोटी रुपयांचं जेवणाचं टेंडर काढलं गेलंय असा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. गुरूवारी एका वर्तमानपत्रात या टेंडरची जाहिरात देण्यात आल्याची माहिती खडसे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांचं वर्षा आणि उपमुख्यमंत्र्यांचं देवगिरी या दोन निवासस्थानांच्या जेवणाचं हे टेंडर आहे. चांगल्या दर्जाचं जेवण उपलब्ध करुन देण्याची अट यात घालण्यात आली आहे. हे टेंडर वर्षभरासाठी असून याअगोदरही टेंडर काढण्यात आलं होतं मात्र याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुन्हा एकदा हे टेंडर काढण्यात आलं आहे. एकीकडे दुष्काळ परिस्थिती गंभीर असताना खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाणी वाचवा असं आवाहन करत आहे. मात्र दुसरीकडे दुष्काळात जनता उपाशी असताना मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर उच्चप्रतिच्या जेवणासाठी 100 कोटींचे टेंडर काढले जात आहे ही दुष्काळग्रस्तांची थट्टा आहे अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2013 12:17 PM IST

'बाबा-दादांच्या जेवणासाठी 100 कोटींचे टेंडर'

15 मार्च

मुंबई : राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारी निवासस्थानांसाठी मात्र 100 कोटी रुपयांचं जेवणाचं टेंडर काढलं गेलंय असा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. गुरूवारी एका वर्तमानपत्रात या टेंडरची जाहिरात देण्यात आल्याची माहिती खडसे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांचं वर्षा आणि उपमुख्यमंत्र्यांचं देवगिरी या दोन निवासस्थानांच्या जेवणाचं हे टेंडर आहे. चांगल्या दर्जाचं जेवण उपलब्ध करुन देण्याची अट यात घालण्यात आली आहे. हे टेंडर वर्षभरासाठी असून याअगोदरही टेंडर काढण्यात आलं होतं मात्र याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुन्हा एकदा हे टेंडर काढण्यात आलं आहे. एकीकडे दुष्काळ परिस्थिती गंभीर असताना खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाणी वाचवा असं आवाहन करत आहे. मात्र दुसरीकडे दुष्काळात जनता उपाशी असताना मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर उच्चप्रतिच्या जेवणासाठी 100 कोटींचे टेंडर काढले जात आहे ही दुष्काळग्रस्तांची थट्टा आहे अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2013 12:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close