S M L

प्राध्यापक ऐकेना, परीक्षा अनिश्चित काळासाठी ढकलल्या पुढे

16 मार्चअमरावती : विविध मागण्यांसाठी सीनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांनी टाकलेल्या बहिष्काराचे परिणाम आता दिसू लागले आहेत. अमरावती विद्यापीठाचे प्राध्यापक संपावर गेल्याने परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. परीक्षा विषयक कामावरच प्राध्यापकांनी बहिष्कार घातल्याने प्रश्नपत्रिका वेळेवर तयार झाल्या नाहीत त्यामुळे अमरावती विद्यापीठाने परिक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णय घेतला आहे. आर्टस आणि कॉमर्सच्या प्रथम वर्ष ते तृतीय वर्षांपर्यंतच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहे. त्यामुळे एसएनडीटी ,पुणे, कोल्हापूर, अमरावती, जऴगाव आणि नागपूर यासंह एकूण आठ विद्यापीठातले विद्यार्थी सध्या हवालदिल झाले आहेत. प्राध्यापक आपल्या मागणीवर ठाम असून सरकारनं फसवणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे. तर दुसरीकडे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठानंही आगामी काळातल्या सर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढं ढकलल्या आहेत. त्यामुळे शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेणार्‍या सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांचा भवितव्य टांगणीला लागलंय. राज्यात वरीष्ठ महाविद्यालयांच्या प्राध्यापकांचा संप सुरु आहे. त्यावर अजून तोडगा निघालेला नाही. 4 फेब्रुवारीपासुन प्राध्यापकांनी कामावर बहिष्कार टाकलाय. त्यामुळे शिवाजी विद्यापीठातील कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यातल्या महाविद्यालयांमध्ये होणार्‍या सगळ्या परीक्षा पुढं ढकल्याण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनानं घेतल्याचं कुलगुरुंनी सांगितलंय. तर संपावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचंही कुलगुरुंनी स्पष्ट केलंय. राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांचा हा प्रश्न सरकार गांभीर्यानं कधी घेणार याकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे डोळे लागले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2013 10:03 AM IST

प्राध्यापक ऐकेना, परीक्षा अनिश्चित काळासाठी ढकलल्या पुढे

16 मार्च

अमरावती : विविध मागण्यांसाठी सीनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांनी टाकलेल्या बहिष्काराचे परिणाम आता दिसू लागले आहेत. अमरावती विद्यापीठाचे प्राध्यापक संपावर गेल्याने परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. परीक्षा विषयक कामावरच प्राध्यापकांनी बहिष्कार घातल्याने प्रश्नपत्रिका वेळेवर तयार झाल्या नाहीत त्यामुळे अमरावती विद्यापीठाने परिक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णय घेतला आहे. आर्टस आणि कॉमर्सच्या प्रथम वर्ष ते तृतीय वर्षांपर्यंतच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहे. त्यामुळे एसएनडीटी ,पुणे, कोल्हापूर, अमरावती, जऴगाव आणि नागपूर यासंह एकूण आठ विद्यापीठातले विद्यार्थी सध्या हवालदिल झाले आहेत. प्राध्यापक आपल्या मागणीवर ठाम असून सरकारनं फसवणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे.

तर दुसरीकडे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठानंही आगामी काळातल्या सर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढं ढकलल्या आहेत. त्यामुळे शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेणार्‍या सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांचा भवितव्य टांगणीला लागलंय. राज्यात वरीष्ठ महाविद्यालयांच्या प्राध्यापकांचा संप सुरु आहे. त्यावर अजून तोडगा निघालेला नाही. 4 फेब्रुवारीपासुन प्राध्यापकांनी कामावर बहिष्कार टाकलाय. त्यामुळे शिवाजी विद्यापीठातील कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यातल्या महाविद्यालयांमध्ये होणार्‍या सगळ्या परीक्षा पुढं ढकल्याण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनानं घेतल्याचं कुलगुरुंनी सांगितलंय. तर संपावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचंही कुलगुरुंनी स्पष्ट केलंय. राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांचा हा प्रश्न सरकार गांभीर्यानं कधी घेणार याकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे डोळे लागले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2013 10:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close