S M L

कालबाह्य बोटींमुळे सागरी सुरक्षा धोक्यात

22 डिसेंबर, मुंबईअजित मांढरेसमुद्रमार्गे दहशतवादी मंुबईत शिरले आणि त्यांनी मुंबईवर हल्ला केला. त्यामुळे समुद्र किनार्‍यावरच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झालाय. या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांची तर झोपच उडालीय. मुंबईतील बंदरांच्या सुरक्षेची जबाबदारी येलोगेट पोलिसांकडे असल्यामुळे त्यांना सध्या रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून बंदरांची सुरक्षा करावी लागतेय पण जुन्या यंत्रणांमुळे पोलिसांना हे जड जातंय.मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे मुंबईच नाही तर संपूर्ण जग हादरलंय. त्यामुळे मुंबईची सुरक्षा वाढवण्यावर चारही बाजूनं भर दिला जातोय. दहशतवाद्यांनी 26 नोव्हेंबरच्या रात्री समुद्रमार्गे कुलाब्याच्या बधवार पार्क इथून मुंबईत प्रवेश केला आणि त्यांनी जे काही केलं ते सार्‍यांनीच पाहिलं. 1993 च्या बॉम्बस्फोटाचं सामानही समुद्रमार्गे आणण्यात आलं. त्यानंतर मंबई पोलिसांनाही समुद्र तटांची गस्त घालण्याकरता सात बोटी देण्यात आल्या. पण आज त्यांची स्थिती इतकी खराब आहे की, त्या बोटीतून गस्त कशी घालायची, असा प्रश्न येलो गेट पोलिसांसमोर आहे. येलो गेट पोलीस माऊली बोटीतून बंदरांवर पेट्रोलिंग करतात. मंुबईतील बंदरांच्या सुरक्षेची जबाबदारी येलो गेट पोलिसांकडे असल्यामुळे पोलिसांना सध्या रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून बंदरांची सुरक्षा करावी लागतेय. ' सात बोटी आहेत. त्यापैकी चारच चालतात. पण त्यांना स्पीड नाही. आता तीन बोटींवर संयुक्तपणे पोलीस आणि कस्टम अधिकारी दिवसरात्र गस्त घालतो. शासनानं त्या कॉन्ट्रक्ट पद्धतीवर घेतल्या आहेत ', असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक नूर मोहम्मद मुलानी यांनी सांगितलं.येलो गेट पोलिसांना भाऊचा धक्का, मोरा, बुचर आयलंड, रेवस बंदरापासून ते विरार वसईपर्यंतच्या समुद्र किनार्‍यांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. पण यासाठी देण्यात आल्यात फक्त सात बोटी. यातील काही बोटींची बिकट अवस्था आहे तर या बोटींना वेगही नसल्यानं पेट्रोलिंग करायला निघालेल्या पोलिसांना अनेक वेळा बघ्याची भूमिका घ्यावी लागते. मुंबईसह राज्याला 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभलाय. पण या सागरी किनार्‍यांची सुरक्षा करण्याकरता फक्त 21 सागरी पोलीस ठाणे आहेत. 5 ठाणे ग्रामीण, 5 रायगड जिल्हा, 6 सिंधुदर्ग, 5 रत्नागिरी जिल्ह्यात तर 36 कोस्टल चौक्या, 22 नौका आणि 7 स्पीड बोट. पण एवढा जथ्था असला तरी त्यातील बहुतेक साधनंही जुनी आणि नादुरुस्तच आहेत आणि ज्या रबरी स्पीडबोटी देण्यात आल्यात त्या समुद्री लाटांमध्ये तग धरू शकत नाही. अशा परिस्थितीत मुंबईची बंदरे किती सुरक्षित आहेत, हा प्रश्नच उपस्थित होतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 22, 2008 12:39 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 22, 2008 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close