S M L

श्याम मनोहर आणि अशोक कामत यांना साहित्य अकादमी पुरस्कार

24 डिसेंबर, मुंबई प्रख्यात साहित्यिक श्याम मनोहर आणि अशोक कामत यांच्यासह विविध भाषेतील 21 जणांना साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. या 21 साहित्यिकांमध्ये 6 कवी, 5 कथाकार आणि 3 समीक्षकांचाही समावेश आहे. 50 हजार रुपये रोख आणि ताम्रपट असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. 17 फेब्रुवारी 2009 रोजी एका विशेष समारंभात या पुरस्काराचं वितरण होणार आहे. श्याम मनोहर यांच्या 'उत्सुकतेने मी झोपलो' साठी त्यांना कादंबरी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. कोकणी भाषेसाठीचा पुरस्कार अशोक कामत यांना मिळाला आहे. पुरस्काराबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना श्याम मनोहर म्हणाले, " पुरस्कार मिळाल्याचा आनंद तर झालाच आहे. पण हा आनंद कधी वृद्धिंगत होईल जेव्हा वाचन संस्कृतीचा जास्त प्रचार होईल तेव्हाच. ज्या लेखकांना पुरस्कार मिळतात, त्यांच्याबद्दल प्रत्येक लोकांना माहीत नसतं.त्यामुळे वाचन संस्कृतीचा प्रसारजास्त व्हायला हवा. " श्याम मनोहरांना पुरस्कार मिळाल्यानं ज्येष्ठ साहित्यिका प्रभा गणोरकर यांना समाधान वाटलं आहे. श्याम मनोहरांच्या लेखणीत इतकी ताकद आहे की, त्यांना जरा उशीराच हा पुरस्कार मिळाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 24, 2008 05:28 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 24, 2008 05:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close