S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • आसाराम बापूंच्या भक्तांचा पत्रकारांवर हल्ला
  • आसाराम बापूंच्या भक्तांचा पत्रकारांवर हल्ला

    Published On: Mar 18, 2013 12:54 PM IST | Updated On: Mar 18, 2013 12:54 PM IST

    18 मार्चनवी मुंबई : ऐरोली येथे आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्या भक्तांनी पत्रकारांवर हल्ला केला. ऐरोलीतल्या एमआयडीसी मैदानावर बापूंचं सत्संग सुरू होतं. तिथे वार्ताकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांवर हा हल्ला करण्यात आला. बापूंनी नागपूरमध्ये पाण्याची नासाडी केल्यानंतर आज राज्य सरकारने त्यांच्या होळीच्या उधळपट्टीवर बंदी घातली. त्याचा राग बापूंच्या भक्तांनी पत्रकारांवर काढला. भक्तांनी एकच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर हल्ला चढवला. संतप्त भक्तांनी पत्रकारांना धक्काबुक्की करत मैदानातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. हे भक्त एवढ्यावर थांबले नाही त्यांनी पत्रकारांचा पाठलाग करून मारहाण केली आणि दगडफेक केली. या हल्ल्यात आयबीएन लोकमतचे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीम मोरे यांनाही दगड लागला. काही भक्तांनी कॅमेरे हिसकावून घेतले. यावेळी उपस्थिती पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. मात्र अजूनही कोणालाही ताब्यात घेतलं नाही.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close