S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • बापूंचे बोल, होळी खेळल्याने पाण्याचा होतो सदुपयोग
  • बापूंचे बोल, होळी खेळल्याने पाण्याचा होतो सदुपयोग

    Published On: Mar 18, 2013 03:58 PM IST | Updated On: Mar 18, 2013 03:58 PM IST

    18 मार्चनवी मुंबई : राज्यात दुष्काळ परिस्थिती असताना आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांनी नागपूरमधल्या होळीवरून चौफेर टीका होऊनही बापूंनी नवी मुंबईत होळी साजरी केली.. त्यात पुन्हा त्यानी पाण्याचा वापर केला. नागपूरइतकी पाण्याची उधळपट्टी केली नसली तरी एवढा वाद होऊनही पाण्याचा वापर करणं टाळलं नाही. उलट त्यांनी मीडियावरच टीका केली. एका माणसासाठी 60 मिली पाणी लागते. होळी खेळल्यानं पाण्याचा सदुपयोग होतोय, यामुळे लोकांचे आजार दूर होता, मानसिक आजार दूर होतात यासाठी अर्धा ग्लास काय एक टँकर सुद्धा पाणी लागले तरी नुकसान काहीही नाही असा दावा त्यांनी केला. तसंच पाण्याचा अपव्यय होतो हे काही सामाजिक संस्थांचे कूट कारस्थान आहे त्यांनी मीडियाला भडकवले आहे असा आरोपही बापूंनी केला.दरम्यान आज नवी मुंबईतील ऐरोली येथील एमआयडीसी मैदानावर बापूंचं सत्संग सुरू होतं. तिथे वार्ताकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांवर त्यांच्या भक्तांनी हल्ला केला. बापूंनी नागपूरमध्ये पाण्याची नासाडी केल्यानंतर आज राज्य सरकारने त्यांच्या होळीच्या उधळपट्टीवर बंदी घातली. त्याचा राग बापूंच्या भक्तांनी पत्रकारांवर काढला. भक्तांनी एकच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर हल्ला चढवला. संतप्त भक्तांनी पत्रकारांना धक्काबुक्की करत मैदानातून पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. हे भक्त एवढ्यावर थांबले नाही त्यांनी पत्रकारांचा पाठलाग करून मारहाण केली आणि दगडफेक केली. या हल्ल्यात आयबीएन लोकमतचे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीम मोरे यांनाही दगड लागला. काही भक्तांनी कॅमेरे हिसकावून घेतले. होळी साजरी करा पण पाण्याचा वापर टाळा -मुख्यमंत्रीदरम्यान, प्रदूषण विरहित सुकी होळी साजरी करा, रासायनिक रंग, प्लास्टिकचे फुगे आणि पाण्याचा वापर टाळा, असं आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. होळीसाठी मंत्रालयात नैसर्गिक रंगाच्या विक्रीचा स्टॉल उभारला जाणार आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close