S M L

धुळ्यात अल्पवयीन मुलींच्या खरेदीविक्रीचे रॅकेट उघड

18 मार्चधुळे : अल्पवयीन मुलींच्या खरेदीविक्रीचं गंभीर रॅकेट सुरू असल्याची खळबळजनक तक्रार धुळ्यातल्या पीडित मुलीने केली आहे. धुळ्यातल्या कुंटनखान्यावर अल्पवयीन मुलीला विकल्याचा प्रकार महिनाभरापूर्वी उघडकीस आला होता. पण हा प्रकार फक्त एका मुलीपुरता तसंच धुळ्यापुरता मर्यादित नाही तर उत्तर महाराष्ट्रातल्या इतर शहरांपासून थेट मुंबईपर्यंत त्याचे धागेदोरे पसरले असल्याची माहिती पुढे येतेय. यातले दलाल अल्पवयीन मुलींना फसवून आणतात. त्यांच्यावर अत्याचार करतात. त्यांना गुंगीचे औषध देऊन जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडतात अशी तक्रार या मुलीनं केली. विशेष म्हणजे यात धुळ्यातले बरेच तथाकथित प्रतिष्ठित सहभागी आहेत. पण संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यात अजूनही पोलिसांना यश आलेलं नाही. आयबीएन लोकमतचे सवाल दलाल सचिन अग्रवाल याला जामीन कसा मिळाला ?मुलींना गुंगीची औषधं देणार्‍या नाना आणि बाबाला पोलिसांनी अटक का केले नाही ?सहभागी लॉज मालकांविरोधात पोलिसांनी कारवाई का केली नाही ?या प्रकरणात संशयित भूमिका असणार्‍या पोलीस अधिकार्‍याविरोधात गृह मंत्रालय शांत का ?

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 18, 2013 09:28 AM IST

धुळ्यात अल्पवयीन मुलींच्या खरेदीविक्रीचे रॅकेट उघड

18 मार्च

धुळे : अल्पवयीन मुलींच्या खरेदीविक्रीचं गंभीर रॅकेट सुरू असल्याची खळबळजनक तक्रार धुळ्यातल्या पीडित मुलीने केली आहे. धुळ्यातल्या कुंटनखान्यावर अल्पवयीन मुलीला विकल्याचा प्रकार महिनाभरापूर्वी उघडकीस आला होता. पण हा प्रकार फक्त एका मुलीपुरता तसंच धुळ्यापुरता मर्यादित नाही तर उत्तर महाराष्ट्रातल्या इतर शहरांपासून थेट मुंबईपर्यंत त्याचे धागेदोरे पसरले असल्याची माहिती पुढे येतेय. यातले दलाल अल्पवयीन मुलींना फसवून आणतात. त्यांच्यावर अत्याचार करतात. त्यांना गुंगीचे औषध देऊन जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडतात अशी तक्रार या मुलीनं केली. विशेष म्हणजे यात धुळ्यातले बरेच तथाकथित प्रतिष्ठित सहभागी आहेत. पण संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यात अजूनही पोलिसांना यश आलेलं नाही. आयबीएन लोकमतचे सवाल दलाल सचिन अग्रवाल याला जामीन कसा मिळाला ?मुलींना गुंगीची औषधं देणार्‍या नाना आणि बाबाला पोलिसांनी अटक का केले नाही ?सहभागी लॉज मालकांविरोधात पोलिसांनी कारवाई का केली नाही ?या प्रकरणात संशयित भूमिका असणार्‍या पोलीस अधिकार्‍याविरोधात गृह मंत्रालय शांत का ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 18, 2013 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close