S M L

द्रमुकनं काढला सरकारचा पाठिंबा

19 मार्चचेन्नई :द् रमुकने आज सकाळी केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. पक्षाध्यक्ष एम. करुणानिधी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय जाहीर केला. यामुळे यूपीए सरकारला मोठा धक्का बसला आहे. केंद्रात द्रमुकचे 5 मंत्री आहेत. तर त्यांच्या 18 खासदारांचा पाठिंबा सरकारच्या स्थैर्यासाठी महत्त्वाचा आहे. पण, शुक्रवारपर्यंत संसदेनं श्रीलंकेविरोधात प्रस्ताव मंजूर केल्यास द्रमुक आपल्या निर्णयाचा फेरविचार करेल असं करुणानिधी यांनी सांगितलं. श्रीलंकेत LTTE विरोधातल्या युद्धादरम्यान श्रीलंकेच्या सैन्यानं तामिळी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात संहार केला असा द्रमुकचा आरोप आहे. श्रीलंकेमध्ये झालेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनांची निंदा करणारा ठराव, अमेरिका या महिन्याच्या अखेरीस संयुक्त राष्ट्रांमध्ये मांडणार आहे. भारताने त्यावेळी श्रीलंकेविरोधात कठोर भूमिका घ्यावी असा द्रमुकचा आग्रह आहे.. द्रमुक गेल्यानंतर 15 व्या लोकसभेत यूपीएचं आता काय बलाबल उरलंय ते पाहूयात...- सध्या लोकसभेत 539 खासदार आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा 270 वर आला - द्रमुकचे 18 खासदार गेल्यामुळे यूपीएकडे सध्या 232 खासदार आहेत- काँग्रेस: 202- राष्ट्रवादी: 9- राष्ट्रीय लोक दल: 5- इतर: 16बाहेरून पाठिंबा : 49- समाजवादी पार्टी: 22- बहुजन समाज पार्टी: 21- राष्ट्रीय जनता दल: 3- जनता दल (सेक्युलर): 3- यूपीए + बाहेरून पाठिंबा: 271हे मंत्री देणार राजीनामे1. एम. के. अळगिरी - खतं आणि रसायन मंत्री2. एस. एस. पलनिमणिक्कम - अर्थ राज्यमंत्री3. डी. नेपोलिअन - सामाजिक न्याय राज्यमंत्री4. एस. जगतरक्षकन - माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री5. एस. गांधीसेल्वन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2013 09:55 AM IST

द्रमुकनं काढला सरकारचा पाठिंबा

19 मार्च

चेन्नई :द् रमुकने आज सकाळी केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. पक्षाध्यक्ष एम. करुणानिधी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय जाहीर केला. यामुळे यूपीए सरकारला मोठा धक्का बसला आहे. केंद्रात द्रमुकचे 5 मंत्री आहेत. तर त्यांच्या 18 खासदारांचा पाठिंबा सरकारच्या स्थैर्यासाठी महत्त्वाचा आहे. पण, शुक्रवारपर्यंत संसदेनं श्रीलंकेविरोधात प्रस्ताव मंजूर केल्यास द्रमुक आपल्या निर्णयाचा फेरविचार करेल असं करुणानिधी यांनी सांगितलं. श्रीलंकेत LTTE विरोधातल्या युद्धादरम्यान श्रीलंकेच्या सैन्यानं तामिळी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात संहार केला असा द्रमुकचा आरोप आहे. श्रीलंकेमध्ये झालेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनांची निंदा करणारा ठराव, अमेरिका या महिन्याच्या अखेरीस संयुक्त राष्ट्रांमध्ये मांडणार आहे. भारताने त्यावेळी श्रीलंकेविरोधात कठोर भूमिका घ्यावी असा द्रमुकचा आग्रह आहे..

द्रमुक गेल्यानंतर 15 व्या लोकसभेत यूपीएचं आता काय बलाबल उरलंय ते पाहूयात...

- सध्या लोकसभेत 539 खासदार आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा 270 वर आला - द्रमुकचे 18 खासदार गेल्यामुळे यूपीएकडे सध्या 232 खासदार आहेत

- काँग्रेस: 202- राष्ट्रवादी: 9- राष्ट्रीय लोक दल: 5- इतर: 16बाहेरून पाठिंबा : 49

- समाजवादी पार्टी: 22- बहुजन समाज पार्टी: 21- राष्ट्रीय जनता दल: 3- जनता दल (सेक्युलर): 3

- यूपीए बाहेरून पाठिंबा: 271हे मंत्री देणार राजीनामे

1. एम. के. अळगिरी - खतं आणि रसायन मंत्री2. एस. एस. पलनिमणिक्कम - अर्थ राज्यमंत्री3. डी. नेपोलिअन - सामाजिक न्याय राज्यमंत्री4. एस. जगतरक्षकन - माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री5. एस. गांधीसेल्वन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2013 09:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close