S M L

आमदारांवर होणार निलंबनाची कारवाई ?

20 मार्चविधिमंडळामध्ये मंगळवारी एपीआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण करणार्‍या आमदारांवर आज निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. आज राज्याचे बजेट मांडण्यापुर्वी दोन प्रस्ताव सभागृहात मांडले जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पहिला प्रस्ताव असेल तो सचिन सुर्यवंशी यांच्या निलंबनाचा आणि दुसरा प्रस्ताव असेल तो मारहाण प्रकरणातील आमदारांचा. नक्की किती आमदारांचं निलंबन केलं जाईल हे काही अजुन कळू शकलेलं नाही. दरम्यान, आज सकाळी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन सूर्यवंशी यांची भेट घेतली. मंगळवारी संध्याकाळी मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये आमदार क्षितीज ठाकूर, मनसेचे आमदार राम कदम यांच्यासह 15 आमदारांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. आज जर निलंबनाची कारवाई झाली तर आमदारांना अटक होण्याची दाट शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2013 07:39 AM IST

आमदारांवर होणार निलंबनाची कारवाई ?

20 मार्च

विधिमंडळामध्ये मंगळवारी एपीआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण करणार्‍या आमदारांवर आज निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. आज राज्याचे बजेट मांडण्यापुर्वी दोन प्रस्ताव सभागृहात मांडले जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पहिला प्रस्ताव असेल तो सचिन सुर्यवंशी यांच्या निलंबनाचा आणि दुसरा प्रस्ताव असेल तो मारहाण प्रकरणातील आमदारांचा. नक्की किती आमदारांचं निलंबन केलं जाईल हे काही अजुन कळू शकलेलं नाही. दरम्यान, आज सकाळी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन सूर्यवंशी यांची भेट घेतली. मंगळवारी संध्याकाळी मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये आमदार क्षितीज ठाकूर, मनसेचे आमदार राम कदम यांच्यासह 15 आमदारांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. आज जर निलंबनाची कारवाई झाली तर आमदारांना अटक होण्याची दाट शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2013 07:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close