S M L

राडेबाज आमदारांना अटक का नाही ?

20 मार्चमुंबई : एपीआयला मारहाण प्रकरणी आमदार राम कदम, क्षितिज ठाकूर, प्रदीप जयस्वाल, जयकुमार रावल, राजन साळवी या पाच आमदारांना 31 डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आलंय. दुपारीच निलंबित आमदार क्षितिज ठाकूर, राम कदम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती. पण सात उलटले तरी त्यांना अटक झालेली नाही. विशेष म्हणजे आमदारांच्या चौकशीसाठी क्राईम ब्रँचचं विशेष पथक आणि स्वतः पोलीस आयुक्त विधानभवनात दाखल झाले आहेत. निलंबित आमदार क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांना विधानभवनातून बाहेर पडताच अटक केली जाऊ शकते. या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पुढील चौकशीतून इतर निलंबित आमदारांना अटक होऊ शकते. आणि ही अटक टाळण्यासाठी आमदार सरकारवर दबाव आणत आहेत. पण अजूनपर्यंत या राडेबाज आमदारांना अटक करण्यात आली नाही. त्यांना अटक होऊ नये, म्हणून सर्व पक्षाचे नेते प्रयत्न करतायत, अशी परिस्थिती दिसतेय. आज पोलीस आयुक्त पथकासोबत विधानभवनात आले, तेव्हा हे आरोपी आमदार मुख्यमंत्र्यांच्या दालनात थांबले होते. आजची अटक टाळण्यासाठी हे आमदार सरकारवर दबाव आणत आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. आज नाट्यमय पद्धतीने आमदारांना विधानभवनात अटक होऊ नये अशी भूमिका विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी घेतली अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. आज अर्थमंत्री अजित पवार यांनी बजेट सादर केल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राडेबाज आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव सभागृहात मंाडला. त्यानुसार विधानसभेच्या अध्यक्षांनी या पाच आमदारांच्या निलंबनाची घोषणा केली. या पाच जणांना 9 महिन्यांसाठी मुंबई आणि नागपूर विधिमंडळ आवारात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनालाही हे आमदार मुकणार आहेत. 'IBN लोकमत'चे सवाल- पोलीस अधिकार्‍याला मारहाण करणार्‍या आमदारांना अजून अटक का होत नाहीये ?- रात्र जेलमध्ये काढावी लागू नये, म्हणून आमदार प्रयत्न करत आहेत का ?- मुख्यमंत्र्यांच्या दालनात आरोपी आमदार काय करत होते ?- आमदारांना वाचवण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे का ?- आमदारांना वाचवण्यात सर्वपक्षीय संगनमत झालंय का ?- सामान्य माणसाने असा हल्ला केला असता, तर त्याला एव्हाना अटक झाली नसती का ?- विधानभवनात धुडगूस घालणारे आमदार कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहेत का ?या राडेबाज आमदारांविरोधात कोणते गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत ते पाहूयात- कलम 143 - गोंधळ माजवणे- कलम 341 - अन्यायाने अडवणूक करणे- कलम 353 - सरकारी नोकराच्या कामात अडथळा करणे- कलम 506 (2) - जीवे मारण्याची धमकी देणे- कलम 323 - हाताने मारहाण करणे- कलम 504- शिवीगाळ करणे

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2013 06:01 PM IST

राडेबाज आमदारांना अटक का नाही ?

20 मार्च

मुंबई : एपीआयला मारहाण प्रकरणी आमदार राम कदम, क्षितिज ठाकूर, प्रदीप जयस्वाल, जयकुमार रावल, राजन साळवी या पाच आमदारांना 31 डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आलंय. दुपारीच निलंबित आमदार क्षितिज ठाकूर, राम कदम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती. पण सात उलटले तरी त्यांना अटक झालेली नाही. विशेष म्हणजे आमदारांच्या चौकशीसाठी क्राईम ब्रँचचं विशेष पथक आणि स्वतः पोलीस आयुक्त विधानभवनात दाखल झाले आहेत. निलंबित आमदार क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांना विधानभवनातून बाहेर पडताच अटक केली जाऊ शकते. या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पुढील चौकशीतून इतर निलंबित आमदारांना अटक होऊ शकते. आणि ही अटक टाळण्यासाठी आमदार सरकारवर दबाव आणत आहेत. पण अजूनपर्यंत या राडेबाज आमदारांना अटक करण्यात आली नाही. त्यांना अटक होऊ नये, म्हणून सर्व पक्षाचे नेते प्रयत्न करतायत, अशी परिस्थिती दिसतेय.

आज पोलीस आयुक्त पथकासोबत विधानभवनात आले, तेव्हा हे आरोपी आमदार मुख्यमंत्र्यांच्या दालनात थांबले होते. आजची अटक टाळण्यासाठी हे आमदार सरकारवर दबाव आणत आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. आज नाट्यमय पद्धतीने आमदारांना विधानभवनात अटक होऊ नये अशी भूमिका विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी घेतली अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. आज अर्थमंत्री अजित पवार यांनी बजेट सादर केल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राडेबाज आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव सभागृहात मंाडला. त्यानुसार विधानसभेच्या अध्यक्षांनी या पाच आमदारांच्या निलंबनाची घोषणा केली. या पाच जणांना 9 महिन्यांसाठी मुंबई आणि नागपूर विधिमंडळ आवारात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनालाही हे आमदार मुकणार आहेत.

'IBN लोकमत'चे सवाल

- पोलीस अधिकार्‍याला मारहाण करणार्‍या आमदारांना अजून अटक का होत नाहीये ?- रात्र जेलमध्ये काढावी लागू नये, म्हणून आमदार प्रयत्न करत आहेत का ?- मुख्यमंत्र्यांच्या दालनात आरोपी आमदार काय करत होते ?- आमदारांना वाचवण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे का ?- आमदारांना वाचवण्यात सर्वपक्षीय संगनमत झालंय का ?- सामान्य माणसाने असा हल्ला केला असता, तर त्याला एव्हाना अटक झाली नसती का ?- विधानभवनात धुडगूस घालणारे आमदार कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहेत का ?

या राडेबाज आमदारांविरोधात कोणते गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत ते पाहूयात

- कलम 143 - गोंधळ माजवणे- कलम 341 - अन्यायाने अडवणूक करणे- कलम 353 - सरकारी नोकराच्या कामात अडथळा करणे- कलम 506 (2) - जीवे मारण्याची धमकी देणे- कलम 323 - हाताने मारहाण करणे- कलम 504- शिवीगाळ करणे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2013 06:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close