S M L

याकूब मेमनची फाशीची शिक्षा कायम

21 मार्चनवी दिल्ली : मुंबईत वीस वर्षांपुर्वी 1993 ला झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने आज जाहीर केला. या हल्ल्याचा मास्टरमाइंड याकूब अब्दुल रझ्झाक मेमनची फाशी कायम ठेवण्यात आली आहे. तर इतर दहा जणांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे सर्व आरोपी गेल्या 20 वर्षांपासून तुरुंगात आहेत. आणि उर्वरित आयुष्यही ते तुरुंगात राहतील असं न्यायालयाने स्पष्ट केलंय. टाडानं एकूण 19 आरोपींना जन्मठेप सुनावली होती. त्यापैकी 17 आरोपींची शिक्षा सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली. अश्रफूर रहमान अझिमुल्ला या आरोपीला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तर एका आरोपीला एचआयव्ही झाल्याने मानवी भूमिकेतून त्याची सुटका करण्यात आली. दरम्यान, या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात होता आणि पाकिस्तान चांगला शेजारी नाही अशी टिपण्णी न्यायालयाने निकाल वाचताना केली. या खटल्यातल्या सर्व आरोपींना चार आठवड्यांमध्ये स्वतःला न्यायालयाच्या हवाली करावे लागणार आहे. कुणा-कुणाला शिक्षा झालीय आणि त्यांचा गुन्हा काय आहे ?- सुप्रीम कोर्टानं ज्या एका दोषीची फाशी कायम ठेवलीय, त्याचं नाव आहे याकूब मेमन- साखळी बॉम्बस्फोटांचा कट रचण्यात तो सहभागी होता फाशी रद्द करून जन्मठेप सुनावली ते कोण आहेत आणि त्यांचा गुन्हा काय आहे ?- मोहम्मद शोएब घनसार : याने झवेरी बाजारात बॉम्ब ठेवला होता - असगर युसूफ मुकादम : याने प्लाझा थिएटरजवळ बॉम्ब ठेवला होता- शहानवाज कुरेशी : याने प्लाझा थिएटरजवळ बॉम्ब ठेवला होता- अब्दुल गनी तुर्क : याने सेंच्युरी बाजार येथे बॉम्ब ठेवला होता- परवेझ नझीर शेख : याने काथ्या बाजार येथे बॉम्ब ठेवला होता- मोहम्मद फारुख पावले : याने स्टॉक एक्स्चेंज, एअर इंडिया आणि सेनाभवन परिसरात बॉम्ब ठेवला होता- झाकीर हुसेन नूर मोहम्मद शेख : याने माहीम परिसरात हल्ला केला होता- अब्दुल अख्तर खान : याने माहीम परिसरात हल्ला केला होता- फिरोझ अमीन मलिक : याने माहीम परिसरात हल्ला केला होता- मुस्ताक तराणी : याने जुहूमधल्या सेंटॉर हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला होतास्फोटामागे पाकिस्तानाच हात1993 च्या बॉम्बस्फोटाचा कट हा दाऊद इब्राहीमने रचला. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणार आयएसआयसुद्धा या कटात सहभागी होती, असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलंय. यातला याकूब मेमन आणि फरार गुन्हेगार हे एखाद्या धनुर्धारीसारखे होते आणि हा कट प्रत्यक्षात उतरवणारे त्यांच्या हातातले बाण होते, असंही कोर्टाने म्हटलं आहे. पोलीस आणि कस्टम अधिकार्‍यांनी शस्त्रास्त्र तस्करीमध्ये सहभाग घेतला यावरही कोर्टाने कडक ताशेरे ओढलेत. याकूब मेमन कोण आहे ?- याकूब मेमन 1993च्या बॉम्बस्फोट खटल्यातला दोषी आहे- याकूब व्यवसायाने चार्टर्ड अकाउंट होता- याकूब हा या खटल्यातील मुख्य आरोपी टायगर मेमनचा भाऊ आहे- याकूबने 1997 मध्ये शरणागती पत्करली- याकूबला 27 जुलै 2007 रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली- बाबरी मशिद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीमध्ये याकूबचे माहीममधील कार्यालय जाळण्यात आले होते- दाऊद इब्राहिमने या खटल्याचा कट कसा रचला याची माहिती याकूबने दिली

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2013 05:27 PM IST

याकूब मेमनची फाशीची शिक्षा कायम

21 मार्च

नवी दिल्ली : मुंबईत वीस वर्षांपुर्वी 1993 ला झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने आज जाहीर केला. या हल्ल्याचा मास्टरमाइंड याकूब अब्दुल रझ्झाक मेमनची फाशी कायम ठेवण्यात आली आहे. तर इतर दहा जणांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे सर्व आरोपी गेल्या 20 वर्षांपासून तुरुंगात आहेत. आणि उर्वरित आयुष्यही ते तुरुंगात राहतील असं न्यायालयाने स्पष्ट केलंय. टाडानं एकूण 19 आरोपींना जन्मठेप सुनावली होती. त्यापैकी 17 आरोपींची शिक्षा सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली. अश्रफूर रहमान अझिमुल्ला या आरोपीला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तर एका आरोपीला एचआयव्ही झाल्याने मानवी भूमिकेतून त्याची सुटका करण्यात आली. दरम्यान, या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात होता आणि पाकिस्तान चांगला शेजारी नाही अशी टिपण्णी न्यायालयाने निकाल वाचताना केली. या खटल्यातल्या सर्व आरोपींना चार आठवड्यांमध्ये स्वतःला न्यायालयाच्या हवाली करावे लागणार आहे.

कुणा-कुणाला शिक्षा झालीय आणि त्यांचा गुन्हा काय आहे ?

- सुप्रीम कोर्टानं ज्या एका दोषीची फाशी कायम ठेवलीय, त्याचं नाव आहे याकूब मेमन- साखळी बॉम्बस्फोटांचा कट रचण्यात तो सहभागी होता

फाशी रद्द करून जन्मठेप सुनावली ते कोण आहेत आणि त्यांचा गुन्हा काय आहे ?- मोहम्मद शोएब घनसार : याने झवेरी बाजारात बॉम्ब ठेवला होता - असगर युसूफ मुकादम : याने प्लाझा थिएटरजवळ बॉम्ब ठेवला होता- शहानवाज कुरेशी : याने प्लाझा थिएटरजवळ बॉम्ब ठेवला होता- अब्दुल गनी तुर्क : याने सेंच्युरी बाजार येथे बॉम्ब ठेवला होता- परवेझ नझीर शेख : याने काथ्या बाजार येथे बॉम्ब ठेवला होता- मोहम्मद फारुख पावले : याने स्टॉक एक्स्चेंज, एअर इंडिया आणि सेनाभवन परिसरात बॉम्ब ठेवला होता- झाकीर हुसेन नूर मोहम्मद शेख : याने माहीम परिसरात हल्ला केला होता- अब्दुल अख्तर खान : याने माहीम परिसरात हल्ला केला होता- फिरोझ अमीन मलिक : याने माहीम परिसरात हल्ला केला होता- मुस्ताक तराणी : याने जुहूमधल्या सेंटॉर हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला होतास्फोटामागे पाकिस्तानाच हात

1993 च्या बॉम्बस्फोटाचा कट हा दाऊद इब्राहीमने रचला. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणार आयएसआयसुद्धा या कटात सहभागी होती, असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलंय. यातला याकूब मेमन आणि फरार गुन्हेगार हे एखाद्या धनुर्धारीसारखे होते आणि हा कट प्रत्यक्षात उतरवणारे त्यांच्या हातातले बाण होते, असंही कोर्टाने म्हटलं आहे. पोलीस आणि कस्टम अधिकार्‍यांनी शस्त्रास्त्र तस्करीमध्ये सहभाग घेतला यावरही कोर्टाने कडक ताशेरे ओढलेत.

याकूब मेमन कोण आहे ?

- याकूब मेमन 1993च्या बॉम्बस्फोट खटल्यातला दोषी आहे- याकूब व्यवसायाने चार्टर्ड अकाउंट होता- याकूब हा या खटल्यातील मुख्य आरोपी टायगर मेमनचा भाऊ आहे- याकूबने 1997 मध्ये शरणागती पत्करली- याकूबला 27 जुलै 2007 रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली- बाबरी मशिद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीमध्ये याकूबचे माहीममधील कार्यालय जाळण्यात आले होते- दाऊद इब्राहिमने या खटल्याचा कट कसा रचला याची माहिती याकूबने दिली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2013 05:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close