S M L

इटली नमली, मारेकरी खलाशी भारतात परतणार

22 मार्चनवी दिल्ली : अखेर भारताच्या दबावापूढे इटली सरकारला झुकावं लागलंय. मच्छिमारांचा हत्येप्रकरणी दोन इटालियन खलाशी आज भारतात दाखल होणार आहेत. मात्र त्यांना तातडीने अटक होणार नसल्याचं अटॉर्नी जनरल यांनी स्पष्ट केलंय. या खलाशांना इटालियन दूतावासात घेऊन जाण्यात येणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या खलाशांना इटालीमध्ये जाऊन आपली शिक्षा पूर्ण करावी लागणार आहे. भारतीय समुद्र किनार्‍यावर एका इटलीच्या व्यापारी जहाजावर तैनात असलेल्या या दोन इटालियन खलाश्यांनी समुद्री चाचे समजून भारतीय दोन मच्छिमारांवर गोळ्या घालून ठार मारले होते. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. पण इटलीत निवडणुकीत मतदान करण्याचे कारण देऊन दोन्ही खलाशी इटलीला परतले होते. मात्र इटलीत दाखल होताच भारतात आमच्यावर खटला चालू शकत नाही असा आव आणला. केंद्र सरकारने दबाव टाकल्यामुळे इटलीला नमतं घ्यावं लागलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2013 11:41 AM IST

इटली नमली, मारेकरी खलाशी भारतात परतणार

22 मार्च

नवी दिल्ली : अखेर भारताच्या दबावापूढे इटली सरकारला झुकावं लागलंय. मच्छिमारांचा हत्येप्रकरणी दोन इटालियन खलाशी आज भारतात दाखल होणार आहेत. मात्र त्यांना तातडीने अटक होणार नसल्याचं अटॉर्नी जनरल यांनी स्पष्ट केलंय. या खलाशांना इटालियन दूतावासात घेऊन जाण्यात येणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या खलाशांना इटालीमध्ये जाऊन आपली शिक्षा पूर्ण करावी लागणार आहे. भारतीय समुद्र किनार्‍यावर एका इटलीच्या व्यापारी जहाजावर तैनात असलेल्या या दोन इटालियन खलाश्यांनी समुद्री चाचे समजून भारतीय दोन मच्छिमारांवर गोळ्या घालून ठार मारले होते. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. पण इटलीत निवडणुकीत मतदान करण्याचे कारण देऊन दोन्ही खलाशी इटलीला परतले होते. मात्र इटलीत दाखल होताच भारतात आमच्यावर खटला चालू शकत नाही असा आव आणला. केंद्र सरकारने दबाव टाकल्यामुळे इटलीला नमतं घ्यावं लागलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2013 11:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close