S M L

तीन आमदारांचं निलंबन मागे घेणार?

22 मार्चमुंबई : पीएसआय सचिन सूर्यंवंशी मारहाण प्रकरणातल्या तीन आमदारांचं निलंबन मागे घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. निलंबित झालेल्यांपैकी मनसेचे आमदार राम कदम आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर अटकेत आहेत. त्या दोघांची नावं एफआयआरमध्ये आहेत. पण एफआयआर मध्ये नावं नसलेल्या भाजपचे आमदार जयकुमार रावल, शिवसेनेचे आमदार राजन साळवी आणि शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल या तीन आमदारांचं निलंबन मागे घेण्यात यावं अशी मागणी सेना भाजपच्या नेत्यांनी सत्ताधारी पक्षाकडे केली आहे. त्यामुळे सेना भाजपच्या या तीन निलंबित आमदाराचं निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव पुढच्या आठवड्यात मांडला जाण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यांचं निलंबन मागे घेणार ?- प्रदीप जयस्वालआमदार, शिवसेना - राजन साळवीआमदार, शिवसेना - जयकुमार रावलआमदार, भाजप

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2013 02:19 PM IST

तीन आमदारांचं निलंबन मागे घेणार?

22 मार्च

मुंबई : पीएसआय सचिन सूर्यंवंशी मारहाण प्रकरणातल्या तीन आमदारांचं निलंबन मागे घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. निलंबित झालेल्यांपैकी मनसेचे आमदार राम कदम आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर अटकेत आहेत. त्या दोघांची नावं एफआयआरमध्ये आहेत. पण एफआयआर मध्ये नावं नसलेल्या भाजपचे आमदार जयकुमार रावल, शिवसेनेचे आमदार राजन साळवी आणि शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल या तीन आमदारांचं निलंबन मागे घेण्यात यावं अशी मागणी सेना भाजपच्या नेत्यांनी सत्ताधारी पक्षाकडे केली आहे. त्यामुळे सेना भाजपच्या या तीन निलंबित आमदाराचं निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव पुढच्या आठवड्यात मांडला जाण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

यांचं निलंबन मागे घेणार ?

- प्रदीप जयस्वालआमदार, शिवसेना

- राजन साळवीआमदार, शिवसेना

- जयकुमार रावलआमदार, भाजप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2013 02:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close