S M L

एटीएसच्या डीसीपींची गोळी झाडून आत्महत्या

23 मार्चठाणे : महाराष्ट्र एटीएसचे उपायुक्त संजय बॅनर्जी यांनी आज डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठाण्याच्या घोडबंदर रोडवरच्या गोवा पोर्तुगीजा हॉटेलमध्ये बॅनर्जी यांनी आत्महत्या केली. आत्महत्येच्या वेळी त्यांची पत्नी आणि दोन मुलं त्यांच्याबरोबर हॉटेलमध्ये होती. बॅनर्जी यांचे कुटुंबीय पाचगणीत राहतात. ते ठाण्यात आले असताना नवरा-बायकोमध्ये भांडण झालं आणि बॅनर्जी यांनी स्वत:च्या सर्व्हीस रिव्हॉल्वरने आपल्याच डोक्यात गोळी घातल्याची माहिती मिळालीय. आत्महत्येच्या वेळी हॉटेलात अनेक लोक जेवणासाठी आले होते तसंच हॉटेलचा स्टाफही होता. आत्महत्येचं कारण अजून समजलेलं नसलं तरी कौटुंबिक वादातून ही आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. ठाणे पोलीस तपासासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतल्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये आणला आहे. कोण होते संजय बॅनर्जी? - बॅनर्जी हे 1995 च्या बॅचचे अधिकारी- औरंगाबाद पोलीस अधीक्षकपदावरही केलं काम- सध्या ATS मध्ये DCP म्हणून कार्यरत होते

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 23, 2013 01:57 PM IST

एटीएसच्या डीसीपींची गोळी झाडून आत्महत्या

23 मार्च

ठाणे : महाराष्ट्र एटीएसचे उपायुक्त संजय बॅनर्जी यांनी आज डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठाण्याच्या घोडबंदर रोडवरच्या गोवा पोर्तुगीजा हॉटेलमध्ये बॅनर्जी यांनी आत्महत्या केली. आत्महत्येच्या वेळी त्यांची पत्नी आणि दोन मुलं त्यांच्याबरोबर हॉटेलमध्ये होती. बॅनर्जी यांचे कुटुंबीय पाचगणीत राहतात. ते ठाण्यात आले असताना नवरा-बायकोमध्ये भांडण झालं आणि बॅनर्जी यांनी स्वत:च्या सर्व्हीस रिव्हॉल्वरने आपल्याच डोक्यात गोळी घातल्याची माहिती मिळालीय. आत्महत्येच्या वेळी हॉटेलात अनेक लोक जेवणासाठी आले होते तसंच हॉटेलचा स्टाफही होता. आत्महत्येचं कारण अजून समजलेलं नसलं तरी कौटुंबिक वादातून ही आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. ठाणे पोलीस तपासासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतल्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये आणला आहे.

कोण होते संजय बॅनर्जी?

- बॅनर्जी हे 1995 च्या बॅचचे अधिकारी- औरंगाबाद पोलीस अधीक्षकपदावरही केलं काम- सध्या ATS मध्ये DCP म्हणून कार्यरत होते

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2013 01:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close