S M L

ज्योत्स्ना दर्डा यांचं निधन

23 मार्चमुंबई : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार विजय दर्डा यांच्या पत्नी ज्योत्स्ना दर्डा यांचं शनिवारी रात्री निधन झालं. त्या 61 वर्षांच्या होत्या. 24 वर्षांपासून त्या कर्करोगाशी लढा देत होत्या. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर उद्या रविवारी यवतमाळ येथे सांयकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पती लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा, मुलगा देवेंद्र, स्नुषा,कन्या पूर्वा मोठा परिवार आहे. 24 वर्षांपासून त्या कर्करोगाशी लढा देत होत्या. त्यांना 5 मार्च रोजी मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कर्करोग यकृतभर पसरला. परिणामी त्यांच्या शरीरातील इतर अवयवही हळूहळू निकामी होत गेले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यात शर्थीने प्रयत्न केला परंतु शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मावळली. ज्योत्सना दर्डा यांचा जन्म 18 जून 1952 रोजी जळगाव येथे झाला. त्यांचे वडील भिकमचंदजी जैन हे स्वातंत्र्या सैनिक होते. ज्योत्सना दर्डा यांनी जळगावलाच बी.ए.पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांच्या पुढाकाराने 1991 मध्ये जैन सहेली मंडळाची स्थापना झाली. याच उदात्त भावनेतून 18 ऑक्टोबर 2000 रोजी लोकमत सखी मंच नावाने शक्तीपीठ स्थापन झाले. त्यांच्याच प्रेरणेने जवाहरलाल दर्डा संगीर कला अकादमीचा जन्म झाला. संखी मंचाच्या रुपाने महाराष्ट्रातील दोन लाख महिलांच्या कर्णधार आणि जगण्यावर निस्सीम प्रेम करणारी महिला असे ज्योत्सना दर्डा यांच्या व्यक्तीमत्त्वाचे नाना पैलू होते. ज्योत्सना दर्डा यांच्या निधनावर सामाजिक, राजकीय, सांस्कृतीक क्षेत्रातील मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 17, 2013 11:25 AM IST

ज्योत्स्ना दर्डा यांचं निधन

23 मार्च

मुंबई : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार विजय दर्डा यांच्या पत्नी ज्योत्स्ना दर्डा यांचं शनिवारी रात्री निधन झालं. त्या 61 वर्षांच्या होत्या. 24 वर्षांपासून त्या कर्करोगाशी लढा देत होत्या. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर उद्या रविवारी यवतमाळ येथे सांयकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पती लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा, मुलगा देवेंद्र, स्नुषा,कन्या पूर्वा मोठा परिवार आहे. 24 वर्षांपासून त्या कर्करोगाशी लढा देत होत्या. त्यांना 5 मार्च रोजी मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कर्करोग यकृतभर पसरला. परिणामी त्यांच्या शरीरातील इतर अवयवही हळूहळू निकामी होत गेले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यात शर्थीने प्रयत्न केला परंतु शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मावळली. ज्योत्सना दर्डा यांचा जन्म 18 जून 1952 रोजी जळगाव येथे झाला. त्यांचे वडील भिकमचंदजी जैन हे स्वातंत्र्या सैनिक होते. ज्योत्सना दर्डा यांनी जळगावलाच बी.ए.पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांच्या पुढाकाराने 1991 मध्ये जैन सहेली मंडळाची स्थापना झाली. याच उदात्त भावनेतून 18 ऑक्टोबर 2000 रोजी लोकमत सखी मंच नावाने शक्तीपीठ स्थापन झाले. त्यांच्याच प्रेरणेने जवाहरलाल दर्डा संगीर कला अकादमीचा जन्म झाला. संखी मंचाच्या रुपाने महाराष्ट्रातील दोन लाख महिलांच्या कर्णधार आणि जगण्यावर निस्सीम प्रेम करणारी महिला असे ज्योत्सना दर्डा यांच्या व्यक्तीमत्त्वाचे नाना पैलू होते. ज्योत्सना दर्डा यांच्या निधनावर सामाजिक, राजकीय, सांस्कृतीक क्षेत्रातील मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2013 05:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close