S M L

आ.ठाकूर-कदम यांची जामिनावर सुटका

25 मार्चमुंबई : पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणार्‍या आमदार क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांना जामीन मंजूर झालाय. दोन्ही आमदारांची आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली आहे. सेशन्स कोर्टाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केलाय. पुढच्या दोन आठवड्यांमध्ये त्यांना जामीनदार द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर कोर्टाने त्यांच्यावर काही निर्बंधही घातले आहेत. दर बुधवारी या ठाकूर आणि कदम या दोघांनाही सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तपास अधिकार्‍यांकडे हजेरी लावावी लागणार आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या तपासात हस्तक्षेप करू नये, त्यांना सहकार्य करावे अशी सूचनाही कोर्टाने त्यांना केली आहे. दोन्ही निलंबित आमदार शुक्रवारपासून तुरुंगात होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 25, 2013 09:08 AM IST

आ.ठाकूर-कदम यांची जामिनावर सुटका

25 मार्च

मुंबई : पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणार्‍या आमदार क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांना जामीन मंजूर झालाय. दोन्ही आमदारांची आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली आहे. सेशन्स कोर्टाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केलाय. पुढच्या दोन आठवड्यांमध्ये त्यांना जामीनदार द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर कोर्टाने त्यांच्यावर काही निर्बंधही घातले आहेत. दर बुधवारी या ठाकूर आणि कदम या दोघांनाही सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तपास अधिकार्‍यांकडे हजेरी लावावी लागणार आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या तपासात हस्तक्षेप करू नये, त्यांना सहकार्य करावे अशी सूचनाही कोर्टाने त्यांना केली आहे. दोन्ही निलंबित आमदार शुक्रवारपासून तुरुंगात होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2013 09:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close