S M L

'आमदारांचं निलंबन मागे घ्या, पोलिसांवर कारवाई करा'

25 मार्चमुंबई: पीएसआय सचिन सूर्यवंशी मारहाण प्रकरणावरुन रंगलेला पोलीस अधिकारी विरुद्ध राजकारण्यांचा सामना अधिकच रंगू लागला आहे. आजही विधानसभेत आमदार राम कदम आणि क्षितीज ठाकुर या निलंबित आमदारांना अटक करण्यासाठी विधान भवनात आलेल्या विनापासधारक पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीय आमदारांनी केली आहे. तसंच अटक न झालेल्या शिवसेनेचे आमदार प्रदीप जैयस्वाल, जयकुमार रावल, राजन साळवी या आमदारांचं निलंबन मागे घेण्यात यावं असाही आग्रह सेनाभाजपच्या नेत्यांनी सरकारकडे धरला आहे. मारहाण आणि अटकेच्या प्रकरणावर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सभागृहात निवेदन करावं अशीही मागणी होत आहे. या गोंधळावरुन विधानसभा पहिल्यांदा एक तासासाठी आणि दुसर्‍यांदा दोन तासासाठी तहकूब करण्यात आली आहे. - आमदारांची नाराजी कायम - पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी - आर.आर.पाटील यांनी निवेदन करावं - आमदारांनी केली मागणी

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 25, 2013 09:37 AM IST

'आमदारांचं निलंबन मागे घ्या, पोलिसांवर कारवाई करा'

25 मार्च

मुंबई: पीएसआय सचिन सूर्यवंशी मारहाण प्रकरणावरुन रंगलेला पोलीस अधिकारी विरुद्ध राजकारण्यांचा सामना अधिकच रंगू लागला आहे. आजही विधानसभेत आमदार राम कदम आणि क्षितीज ठाकुर या निलंबित आमदारांना अटक करण्यासाठी विधान भवनात आलेल्या विनापासधारक पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीय आमदारांनी केली आहे. तसंच अटक न झालेल्या शिवसेनेचे आमदार प्रदीप जैयस्वाल, जयकुमार रावल, राजन साळवी या आमदारांचं निलंबन मागे घेण्यात यावं असाही आग्रह सेनाभाजपच्या नेत्यांनी सरकारकडे धरला आहे. मारहाण आणि अटकेच्या प्रकरणावर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सभागृहात निवेदन करावं अशीही मागणी होत आहे. या गोंधळावरुन विधानसभा पहिल्यांदा एक तासासाठी आणि दुसर्‍यांदा दोन तासासाठी तहकूब करण्यात आली आहे.

- आमदारांची नाराजी कायम - पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी - आर.आर.पाटील यांनी निवेदन करावं - आमदारांनी केली मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2013 09:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close