S M L

संजय दत्तला माफी नको :शिवसेना

25 मार्चमुंबईत झालेल्या 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्तच्या शिक्षेवर माफीला शिवसेनेनं विरोध केला आहे. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संजय दत्त तुरूंगात असताना पाठिंबा दिला होता. आज त्यांच्या पाठिंब्याविरोधात शिवसेनेनं वेगळी भूमिका घेतली आहे.1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तला पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संजय दत्तने अगोदरच 18 महिने शिक्षा भोगली आहे. संजय दत्तला माफी द्यावी यासाठी बॉलिवूडच्या मंडळीसोबत काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी झाले आहे. मात्र संजय दत्तच्या माफीला शिवसेनेनं विरोध केला आहे. संजय दत्तला माफी दिल्यास चुकीचा पायंडा पडेल असं शिवसेनेच्या आमदार निलम गोर्‍हे यांनी विधान परिषदेत म्हटलं आहे. संजय दत्त तुरूंगात असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहिर पाठिंबा दिला होता. बाळासाहेबांच्या पाठिंब्यामुळे काहीदिवसातच संजय दत्तची तुरूंगातून सुटका झाली होती. ज्यादिवशी सुटका झाली त्याच दिवशी संजूबाबा मातोश्रीवर दाखल होऊन बाळासाहेबांचे आभार मानले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 25, 2013 10:02 AM IST

संजय दत्तला माफी नको :शिवसेना

25 मार्च

मुंबईत झालेल्या 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्तच्या शिक्षेवर माफीला शिवसेनेनं विरोध केला आहे. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संजय दत्त तुरूंगात असताना पाठिंबा दिला होता. आज त्यांच्या पाठिंब्याविरोधात शिवसेनेनं वेगळी भूमिका घेतली आहे.

1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तला पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संजय दत्तने अगोदरच 18 महिने शिक्षा भोगली आहे. संजय दत्तला माफी द्यावी यासाठी बॉलिवूडच्या मंडळीसोबत काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी झाले आहे. मात्र संजय दत्तच्या माफीला शिवसेनेनं विरोध केला आहे. संजय दत्तला माफी दिल्यास चुकीचा पायंडा पडेल असं शिवसेनेच्या आमदार निलम गोर्‍हे यांनी विधान परिषदेत म्हटलं आहे. संजय दत्त तुरूंगात असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहिर पाठिंबा दिला होता. बाळासाहेबांच्या पाठिंब्यामुळे काहीदिवसातच संजय दत्तची तुरूंगातून सुटका झाली होती. ज्यादिवशी सुटका झाली त्याच दिवशी संजूबाबा मातोश्रीवर दाखल होऊन बाळासाहेबांचे आभार मानले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2013 10:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close