S M L

मुलायम सिंह यादव यांचे तिसर्‍या आघाडीचे संकेत

25 मार्चसांगली : द्रमुकने पाठिंबा काढल्यानंतर समाजवादी पक्षाच्या बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावर यूपीए सरकार तरलंय. पण समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता आहे. 2013 मध्ये लोकसभेच्या निवडणुका व्हाव्यात, यासाठी मुलायम सिंह प्रयत्न करत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी निवडणुकांची तयारी करायला सांगितलंय. होळीनंतर मुलायम सिंह एक मोठी सभा घेतील अशी शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. पंतप्रधान होण्यासाठी ही शेवटची संधी आहे, असं मुलायम सिंह यांना वाटतंय. सांगलीत रविवारी झालेल्या सभेत मुलायम सिंग यांनी या प्रकरणी संकेत दिले होते. एका पक्षाचं सरकार येण्याचे दिवस गेले आहेत आणि आता सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे असं त्यांनी म्हटलं होतं. याच संदर्भात मुलायम सिंग यांनी राम गोपाल यादव आणि नरेश अगरवाल यांना बीजीडी, तृणमूल काँग्रेस, द्रमुकं, आरएलडी, आरजेडी आणि एजीपी या पक्षांशी चर्चा करायला संगितलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 25, 2013 11:07 AM IST

मुलायम सिंह यादव यांचे तिसर्‍या आघाडीचे संकेत

25 मार्च

सांगली : द्रमुकने पाठिंबा काढल्यानंतर समाजवादी पक्षाच्या बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावर यूपीए सरकार तरलंय. पण समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता आहे. 2013 मध्ये लोकसभेच्या निवडणुका व्हाव्यात, यासाठी मुलायम सिंह प्रयत्न करत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी निवडणुकांची तयारी करायला सांगितलंय. होळीनंतर मुलायम सिंह एक मोठी सभा घेतील अशी शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. पंतप्रधान होण्यासाठी ही शेवटची संधी आहे, असं मुलायम सिंह यांना वाटतंय. सांगलीत रविवारी झालेल्या सभेत मुलायम सिंग यांनी या प्रकरणी संकेत दिले होते. एका पक्षाचं सरकार येण्याचे दिवस गेले आहेत आणि आता सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे असं त्यांनी म्हटलं होतं. याच संदर्भात मुलायम सिंग यांनी राम गोपाल यादव आणि नरेश अगरवाल यांना बीजीडी, तृणमूल काँग्रेस, द्रमुकं, आरएलडी, आरजेडी आणि एजीपी या पक्षांशी चर्चा करायला संगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2013 11:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close