S M L

मुंबईसह देशभरात होळीची धूम

27 मार्च'बुरा ना मानो होली है' असं म्हणत सगळीकडेच धुळवड साजरी केली जातेय. एकमेकांना रंग लावत काही ठिकाणी कोरडी होळी खेळली जातेय.तर काही ठिकाणी पाण्याचा वापर केला जातोय. पण असं असलं तरी राज्यातला दुष्काळ लक्षात घेता कोरडी होळी खेळण्यावर भर दिला जातोय. सगळीकडेच उत्साहात वेगवेगळ्या रंगांनी रंगलेले चेहरे 'होली है...'असं म्हणत होळीचा आनंद लुटत आहेत. ठाण्यातल्या गडकरी रंगायतनच्या कट्‌ट्यावरही मराठी कलाकारांची कोरडी रंगपंचमी रंगली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मराठी कलाकारांनी हळद आणि पर्यावरणाभिमुख रंगांचा वापर केला. ठाण्यातले दिग्दर्शक विजू माने, मंगेश देसाई, सुप्रिया पाठारे या कलाकारांसोबत अनेक नव्या कलाकारांनी देखील धुळवड साजरी केली. या उत्सवात गेल्या वर्षी 'खेळ मांडला' या चित्रपटाचे शीर्षक घेऊन धुळवड साजरी करण्यात आली. याबरोबर यंदा नवीन येणार्‍या चूकभूल द्यावी घ्यावी या चित्रपटाच्या नावानं सण साजरा केल्याचं मंगेश देसाईंनी सांगितलं. तर दुसरीकडे पर्यावरण दक्षता मंच या संस्थेच्या वतीनं पर्यावरणाभिमुख धुळवड साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे ठाण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात साजरी करण्यात आलेल्या धुळवडीत खास करून पानाफुलांपासून तयार करण्यात आलेले रंग वापरले गेले. रत्नागिरीतही जोरदार होळी साजरी होतेय. होळीनंतर पुढचे पाच दिवस रोंबाट, तमाशा, आणि गोमूचे खेळे यासारख्या पारंपरिक लोककलांनी कोकणातील शिमगा विशेष असतो. म्हणूनच कोकण रेल्वेनंही याहीवर्षी होळीसाठी विशेष गाड्या सोडल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 27, 2013 09:42 AM IST

मुंबईसह देशभरात होळीची धूम

27 मार्च

'बुरा ना मानो होली है' असं म्हणत सगळीकडेच धुळवड साजरी केली जातेय. एकमेकांना रंग लावत काही ठिकाणी कोरडी होळी खेळली जातेय.तर काही ठिकाणी पाण्याचा वापर केला जातोय. पण असं असलं तरी राज्यातला दुष्काळ लक्षात घेता कोरडी होळी खेळण्यावर भर दिला जातोय. सगळीकडेच उत्साहात वेगवेगळ्या रंगांनी रंगलेले चेहरे 'होली है...'असं म्हणत होळीचा आनंद लुटत आहेत.

ठाण्यातल्या गडकरी रंगायतनच्या कट्‌ट्यावरही मराठी कलाकारांची कोरडी रंगपंचमी रंगली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मराठी कलाकारांनी हळद आणि पर्यावरणाभिमुख रंगांचा वापर केला. ठाण्यातले दिग्दर्शक विजू माने, मंगेश देसाई, सुप्रिया पाठारे या कलाकारांसोबत अनेक नव्या कलाकारांनी देखील धुळवड साजरी केली. या उत्सवात गेल्या वर्षी 'खेळ मांडला' या चित्रपटाचे शीर्षक घेऊन धुळवड साजरी करण्यात आली. याबरोबर यंदा नवीन येणार्‍या चूकभूल द्यावी घ्यावी या चित्रपटाच्या नावानं सण साजरा केल्याचं मंगेश देसाईंनी सांगितलं. तर दुसरीकडे पर्यावरण दक्षता मंच या संस्थेच्या वतीनं पर्यावरणाभिमुख धुळवड साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे ठाण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात साजरी करण्यात आलेल्या धुळवडीत खास करून पानाफुलांपासून तयार करण्यात आलेले रंग वापरले गेले. रत्नागिरीतही जोरदार होळी साजरी होतेय. होळीनंतर पुढचे पाच दिवस रोंबाट, तमाशा, आणि गोमूचे खेळे यासारख्या पारंपरिक लोककलांनी कोकणातील शिमगा विशेष असतो. म्हणूनच कोकण रेल्वेनंही याहीवर्षी होळीसाठी विशेष गाड्या सोडल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 27, 2013 09:42 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close