S M L

मराठा आरक्षणासाठी नारायण राणेंच्या अध्यक्षतेखाली समिती

27 मार्चमुंबई: मराठा आरक्षणासाठी उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली 4 मंत्री आणि 4 सचिवांची उच्चस्तरीय समिती आज नेमण्यात आली आहे. तसा जीआर सरकारने जारी केला. या समितीला 3 महिन्यांच्या आत अंतिम अहवाल सरकारला सादर करायचा आहे. पण ही समिती स्थापन करताना राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाच्या अधिकारांवर गदा आणली आहे. आधीच बापट आयोगानं मराठा समाजाला आरक्षण नाकारलं होतं. पण त्यांचा अहवाल पुनर्विचारासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवण्यात आला होता. त्यावर काही निर्णय होण्याआधीच राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नारायण राणेंच्या अध्यक्षतेखाली आज समिती नेमली. त्यामुळे एकप्रकारे मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार नारायण राणे समितीकडे वर्ग झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 27, 2013 11:18 AM IST

मराठा आरक्षणासाठी नारायण राणेंच्या अध्यक्षतेखाली समिती

27 मार्च

मुंबई: मराठा आरक्षणासाठी उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली 4 मंत्री आणि 4 सचिवांची उच्चस्तरीय समिती आज नेमण्यात आली आहे. तसा जीआर सरकारने जारी केला. या समितीला 3 महिन्यांच्या आत अंतिम अहवाल सरकारला सादर करायचा आहे. पण ही समिती स्थापन करताना राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाच्या अधिकारांवर गदा आणली आहे. आधीच बापट आयोगानं मराठा समाजाला आरक्षण नाकारलं होतं. पण त्यांचा अहवाल पुनर्विचारासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवण्यात आला होता. त्यावर काही निर्णय होण्याआधीच राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नारायण राणेंच्या अध्यक्षतेखाली आज समिती नेमली. त्यामुळे एकप्रकारे मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार नारायण राणे समितीकडे वर्ग झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 27, 2013 11:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close