S M L

मालेगाव बॉम्बस्फोट तपासावर सर्व पक्षांची चुप्पी

25 डिसेंबर, नागपूरआशिष जाधवआगामी निवडणुकांमध्ये मालेगाव बॉम्बस्फोट तपासांचा विषय हा निवडणूकीचा मुद्दा होवू नये, असं सेना-भाजप युती तसंच काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचं मत आहे. त्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोटाच्या चर्चेपासून दूर राहण्याचा प्रयत्न विरोधक तसंच सत्ताधारी करताना दिसत आहेत. हिवाळी अधिवेशनाचा एक-एक दिवस सरतोय पण मालेगाव बॉम्बस्फोटाच्या चर्चेला तोंड फुटत नाही. बुधवारी विधानसभेत कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा झाली. पण त्यावेळीही मालेगाव बॉम्बस्फोटाचा विषय समोर आलाच नाही. सध्या विषय एकच.. तो म्हणजे मुंबईवरील दहशतवादी हल्ला. कायदा आणि सुव्यवस्थेच्या चर्चेत मुंबईवरील हल्ल्याचा विषय आला. त्यावेळी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी झाली. पण मालेगावचा विषय बाजूलाच राहीला. त्यासाठी नेहमीच वेगवेगळी कारणं पुढे केली जात आहेत. "या अधिवेशनात मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांची सहा-सात तास चर्चा झाली. नंतर कायदा आणि सुव्यवस्थेवरही चर्चा झाली. त्या चर्चेत मालेगावच्या अनुषंगानेही चर्चा झाली" असं भाजप आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितलं.मालेगाव बॉम्बस्फोटात हिंदुत्ववादी संघटनेचा हात आहे हे एटीएसनं जगजाहीर केलं. त्यावरून मुंबईच्या हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यावर टीकाही झाली होती. हेमंत करकरे यांची धिंड काढण्याची भाषाही काही पक्षांनी केली. राजकीय स्वार्थासाठी आता हेच पक्ष त्यांच्या बहादुरीचे गोडवे गात आहेत. आणि आता तर सरकारही करकरेंच्या पाठीशी नाही, असंच चित्र निर्माण झालं आहे.मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मालेगावचा विषय कदाचित आपल्या विरोधात जाईल अशी भीती सत्ताधार्‍यांना वाटते. मालेगाववर सत्ताधार्‍यांनाही चर्चा नकोय. त्यासाठी तेही सबबी देत आहेत. "सभागृहात प्रत्येकाचे रोल ठरले आहेत. मालगावचा मुद्दा हा दोघांसाठीही महत्त्वाचा आहे. सभापतींनी परवानगी दिली, तर त्या मुद्द्यावर चर्चा करायची तयारी आहे" असं ते म्हणाले.थोडक्यात काय तर तेरी भी चूप , मेरीभी चूप म्हणत सत्ताधारी आणि विरोधक मालेगाव बाबत चालढकल करत आहेत, हेच यानिमित्ताने स्पष्ट झालंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 25, 2008 06:44 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 25, 2008 06:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close