S M L

संपकरी प्राध्यापकांचे वेतन रोखणार

28 मार्चमुंबई : सीनिअर कॉलेजच्या शिक्षकांच्या संपाला तब्बल 52 दिवस झाले आहेत. पण अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही. संपात सहभागी झालेल्या प्राध्यापकांचं वेतन रोखण्याचा निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण संचालक प्र.रा. गायकवाड यांनी दिली आहे. याबरोबरच महाविद्यालयाकडून संपात सहभागी झालेल्या प्राध्यापकांची माहिती मागवली जात असून त्यानुसार प्राध्यापकांचं वेतन रोखलं जाणार आहे. याबरोबरच प्राध्यापकांवर मेस्मा अंतर्गत कारवाई केली जाण्याची शक्यताही वर्तवली जातेय. विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिकाचे 40 गूण विद्यापीठाकडे देणारच नसल्याचंही शिक्षकांनी स्पष्ट केलंय, त्यामुळे हा संप आणखीन चिघळला आहे. प्राध्यापकांच्या बहिष्काराचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. मुंबईमध्ये सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांची वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षाची परीक्षा आजपासून सुरू झाली. पण साठे कॉलेजमध्ये तब्बल एक ते सव्वा तास परीक्षा उशिराने सुरू झाली. अनुभव नसलेले माध्यमिक शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांना सुपरव्हिजनसाठी आले होते. यामुळे विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकेत फॉर्म भरण्याची माहिती ते देऊ शकले नाहीत. या सगळ्यात विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 28, 2013 12:28 PM IST

संपकरी प्राध्यापकांचे वेतन रोखणार

28 मार्च

मुंबई : सीनिअर कॉलेजच्या शिक्षकांच्या संपाला तब्बल 52 दिवस झाले आहेत. पण अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही. संपात सहभागी झालेल्या प्राध्यापकांचं वेतन रोखण्याचा निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण संचालक प्र.रा. गायकवाड यांनी दिली आहे. याबरोबरच महाविद्यालयाकडून संपात सहभागी झालेल्या प्राध्यापकांची माहिती मागवली जात असून त्यानुसार प्राध्यापकांचं वेतन रोखलं जाणार आहे. याबरोबरच प्राध्यापकांवर मेस्मा अंतर्गत कारवाई केली जाण्याची शक्यताही वर्तवली जातेय. विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिकाचे 40 गूण विद्यापीठाकडे देणारच नसल्याचंही शिक्षकांनी स्पष्ट केलंय, त्यामुळे हा संप आणखीन चिघळला आहे.

प्राध्यापकांच्या बहिष्काराचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. मुंबईमध्ये सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांची वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षाची परीक्षा आजपासून सुरू झाली. पण साठे कॉलेजमध्ये तब्बल एक ते सव्वा तास परीक्षा उशिराने सुरू झाली. अनुभव नसलेले माध्यमिक शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांना सुपरव्हिजनसाठी आले होते. यामुळे विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकेत फॉर्म भरण्याची माहिती ते देऊ शकले नाहीत. या सगळ्यात विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2013 12:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close