S M L

लोहारिया हत्या प्रकरणात पोलीस आयुक्त संशयाच्या भोवर्‍यात

29 मार्चनवी मुंबई : बिल्डर सुनील लोहारिया यांच्या हत्येप्रकरणी आता धक्कादायक वळण लागण्याची शक्यता आहे. मुख्य आरोपी बिल्डर सुरेश बिजलानी आणि आर्किटेक्चर अनुराग गर्ग फरार आहेत. मात्र, त्यांना नवी मुंबई पोलिसांनी पाठीशी घातल्याचा आरोप लोहारियांच्या कुटुंबियांनी केलाय. लोहारियांच्या हत्येपूर्वी 135 वेळा पोलीस आयुक्त अशोक शर्मा आणि सुरेश बिजलानी यांचं संभाषण झालं होतं. त्याचे कॉल डिटेल्स मुंबई क्राईम ब्रांचकडे आल्याने पोलीस आयुक्त अडचणीत आले आहेत. हे कॉल डीटेल्स आयबीएन लोकमतच्या हाती लागली आहेत. नवी मुंबईतले बिल्डर सुनील लोहारिया यांच्या हत्येला आता दीड महिना उलटलाय. पण या हत्येप्रकरणातला मुख्य आरोपी बिल्डर सुरेश बिजलानी अजूनही फरार आहे. या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईवर टीका होत असतानाच.. आता खुद्द पोलीस आयुक्त अशोक शर्माच यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे. लोहारियांच्या हत्येपूर्वी पोलीस आयुक्त अशोक शर्मा आणि आरोपी सुरेश बिजलानी यांच्यात तब्बल 135 वेळा मोबाईलवरून संभाषण झाल्याचा आरोप लोहारियांच्या मुलाने केलाय. त्याने तसे कॉल डीटेल्सही सादर केलेत. आयबीएन-लोकमतच्या हाती असलेल्या या कॉल डीटेल्सची तपासणी सध्या क्राईम ब्रांच करतंय. शर्मा-बिजलानी संभाषण?- 2 एप्रिल 2012 : पहिलं संभाषण- एक वर्षात तब्बल 135 कॉल- 14 फेब्रुवारी 2013 : शेवटचं संभाषण- प्रत्येक कॉलचा कालावधी 15 ते 20 मिनिटंफरार आरोपी सुरेश बिजलानी आणि आर्किटेक्चर अनुराग गर्ग यांना नवी मुंबई पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप लोहारिया यांच्या कुटुंबीयांनी केला. पोलीस आयुक्त अशोक शर्मा आणि आरोपी बिल्डर सुरेश बिजलानी यांचे नेमके संबंध काय आहेत ? सुरेश बिजलानी यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असताना पोलीस आयुक्तांनी बिजलानी यांना फोन का केला? आपल्या संभाषणात या दोघांचं नेमकं काय बोलणं झालं? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत. पण पोलीस आयुक्तांनी मात्र याबद्दल स्पष्टीकरण द्यायला नकार दिलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 29, 2013 12:03 PM IST

लोहारिया हत्या प्रकरणात पोलीस आयुक्त संशयाच्या भोवर्‍यात

29 मार्च

नवी मुंबई : बिल्डर सुनील लोहारिया यांच्या हत्येप्रकरणी आता धक्कादायक वळण लागण्याची शक्यता आहे. मुख्य आरोपी बिल्डर सुरेश बिजलानी आणि आर्किटेक्चर अनुराग गर्ग फरार आहेत. मात्र, त्यांना नवी मुंबई पोलिसांनी पाठीशी घातल्याचा आरोप लोहारियांच्या कुटुंबियांनी केलाय. लोहारियांच्या हत्येपूर्वी 135 वेळा पोलीस आयुक्त अशोक शर्मा आणि सुरेश बिजलानी यांचं संभाषण झालं होतं. त्याचे कॉल डिटेल्स मुंबई क्राईम ब्रांचकडे आल्याने पोलीस आयुक्त अडचणीत आले आहेत. हे कॉल डीटेल्स आयबीएन लोकमतच्या हाती लागली आहेत.

नवी मुंबईतले बिल्डर सुनील लोहारिया यांच्या हत्येला आता दीड महिना उलटलाय. पण या हत्येप्रकरणातला मुख्य आरोपी बिल्डर सुरेश बिजलानी अजूनही फरार आहे. या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईवर टीका होत असतानाच.. आता खुद्द पोलीस आयुक्त अशोक शर्माच यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे. लोहारियांच्या हत्येपूर्वी पोलीस आयुक्त अशोक शर्मा आणि आरोपी सुरेश बिजलानी यांच्यात तब्बल 135 वेळा मोबाईलवरून संभाषण झाल्याचा आरोप लोहारियांच्या मुलाने केलाय. त्याने तसे कॉल डीटेल्सही सादर केलेत. आयबीएन-लोकमतच्या हाती असलेल्या या कॉल डीटेल्सची तपासणी सध्या क्राईम ब्रांच करतंय. शर्मा-बिजलानी संभाषण?

- 2 एप्रिल 2012 : पहिलं संभाषण- एक वर्षात तब्बल 135 कॉल- 14 फेब्रुवारी 2013 : शेवटचं संभाषण- प्रत्येक कॉलचा कालावधी 15 ते 20 मिनिटं

फरार आरोपी सुरेश बिजलानी आणि आर्किटेक्चर अनुराग गर्ग यांना नवी मुंबई पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप लोहारिया यांच्या कुटुंबीयांनी केला. पोलीस आयुक्त अशोक शर्मा आणि आरोपी बिल्डर सुरेश बिजलानी यांचे नेमके संबंध काय आहेत ? सुरेश बिजलानी यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असताना पोलीस आयुक्तांनी बिजलानी यांना फोन का केला? आपल्या संभाषणात या दोघांचं नेमकं काय बोलणं झालं? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत. पण पोलीस आयुक्तांनी मात्र याबद्दल स्पष्टीकरण द्यायला नकार दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2013 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close