S M L

धुळे सेक्स रॅकेट प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट

30 मार्चधुळे : इथं वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींचा वापर करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना दोन महिने उलटल्यावरही अपयश आलंय. 28 जानेवारीला हा गुन्हा दाखल झालाय. या रॅकेटमधून मोठ्या हिंमतीने स्वत:ची सुटका करणार्‍या एका मुलीमुळे हा काळा व्यापार उघडकीला आला. यातला एक अरोपी गणेश चौधरी याला पोलिसांनी अटक केली. मात्र संजय बोरसेसह तीन आरोपी दोन महिन्यांनंतरही फरार आहेत. बोरसे हा धुळ्यातल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या शिक्षण संस्थेत सिनीअर क्लार्क म्हणून काम करतो. वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींचा व्यापार करणार्‍यांविरोधात मोक्का लावण्यात यावा अशी मागणी सामाजिक संघटना होतेय. बाल न्यायालयात हे प्रकरण चालावं आणि त्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती व्हावी या मागण्या महिला नागरी हक्क संरक्षण समितीच्यावतीनं करण्यात येत आहेत. धुळ्यातल्या सर्वपक्षीय महिलांनी या समितीच्या छत्राखाली एकत्र येऊन या प्रकरणाचा पाठपुरावा केला. पोलिसांकडे मुलीनं दिलेल्या जबानीतून याचे धागेदोरे जळगाव, मालेगाव, नाशिक ते थेट सिन्नरपर्यंत असल्याचं पुढे आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 30, 2013 09:45 AM IST

धुळे सेक्स रॅकेट प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट

30 मार्च

धुळे : इथं वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींचा वापर करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना दोन महिने उलटल्यावरही अपयश आलंय. 28 जानेवारीला हा गुन्हा दाखल झालाय. या रॅकेटमधून मोठ्या हिंमतीने स्वत:ची सुटका करणार्‍या एका मुलीमुळे हा काळा व्यापार उघडकीला आला. यातला एक अरोपी गणेश चौधरी याला पोलिसांनी अटक केली. मात्र संजय बोरसेसह तीन आरोपी दोन महिन्यांनंतरही फरार आहेत. बोरसे हा धुळ्यातल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या शिक्षण संस्थेत सिनीअर क्लार्क म्हणून काम करतो. वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींचा व्यापार करणार्‍यांविरोधात मोक्का लावण्यात यावा अशी मागणी सामाजिक संघटना होतेय. बाल न्यायालयात हे प्रकरण चालावं आणि त्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती व्हावी या मागण्या महिला नागरी हक्क संरक्षण समितीच्यावतीनं करण्यात येत आहेत. धुळ्यातल्या सर्वपक्षीय महिलांनी या समितीच्या छत्राखाली एकत्र येऊन या प्रकरणाचा पाठपुरावा केला. पोलिसांकडे मुलीनं दिलेल्या जबानीतून याचे धागेदोरे जळगाव, मालेगाव, नाशिक ते थेट सिन्नरपर्यंत असल्याचं पुढे आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2013 09:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close