S M L

जिथे IPL मॅचेस आहेत, तिथे दुष्काळ नाही :राष्ट्रवादी

01 मार्चमुंबई : महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असल्यामुळे राज्यातल्या आयपीएलच्या मॅचेस राज्याबाहेर हलवण्याची मागणी भाजप नेते विनोद तावडे यांनी केलीय. पण राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र आयपीएलची बाजू उचलून धरलीये. जिथे मॅचेस होत आहेत, तिथे दुष्काळ नाही असं प्रतिउत्तर राष्ट्रवादीने दिलंय. तर आयपीएल न खेळवण्याच्या मागणीवर सकारात्मक विचार करू आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याचा सर्वोत्तपरी प्रयत्न करू, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधना परिषदेत दिलं. 3 एप्रिलपासून आयपीएलच्या सहाव्या सिझनला सुरूवात होणार आहे. मॅचेससाठी मुंबई,पुणे येथील स्टेडियम सज्ज करण्यात झाली आहे. यासाठी मैदानाची निगा राखण्यासाठी लाखो लिटर पाणी वापरण्यात आले. राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असताना क्रिकेटच्या मॅचेसाठी लाखो लिटर पाण्याचा अपव्यय का करायचा असा प्रश्न उपस्थित करत विनोद तावडेंनी आयपीएलचे सामने राज्याबाहेर हलवण्यात यावे अशी मागणी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2013 03:01 PM IST

जिथे IPL मॅचेस आहेत, तिथे दुष्काळ नाही :राष्ट्रवादी

01 मार्च

मुंबई : महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असल्यामुळे राज्यातल्या आयपीएलच्या मॅचेस राज्याबाहेर हलवण्याची मागणी भाजप नेते विनोद तावडे यांनी केलीय. पण राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र आयपीएलची बाजू उचलून धरलीये. जिथे मॅचेस होत आहेत, तिथे दुष्काळ नाही असं प्रतिउत्तर राष्ट्रवादीने दिलंय. तर आयपीएल न खेळवण्याच्या मागणीवर सकारात्मक विचार करू आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याचा सर्वोत्तपरी प्रयत्न करू, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधना परिषदेत दिलं. 3 एप्रिलपासून आयपीएलच्या सहाव्या सिझनला सुरूवात होणार आहे. मॅचेससाठी मुंबई,पुणे येथील स्टेडियम सज्ज करण्यात झाली आहे. यासाठी मैदानाची निगा राखण्यासाठी लाखो लिटर पाणी वापरण्यात आले. राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असताना क्रिकेटच्या मॅचेसाठी लाखो लिटर पाण्याचा अपव्यय का करायचा असा प्रश्न उपस्थित करत विनोद तावडेंनी आयपीएलचे सामने राज्याबाहेर हलवण्यात यावे अशी मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2013 09:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close