S M L

नगरपंचायत निवडणुकीत नारायण राणेंनी गड राखला

01 एप्रिलकोकणात महसूल मंत्री नारायण राणे यांनी नगरपंचायत निवडणुकीत आपला गड शाबूत राखला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. नारायण राणे यांचा मतदारसंघ असलेल्या कणकवलीमध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. काँग्रेसला 17 पैकी 13 जागा मिळाल्या आहेत. गुहागर नगरपंचायतीत 17 पैकी 11 जागा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता मिळवलीय. तर सहा जागा शिवसेना-भाजपाकडे गेल्या आहेत. देवरूख नगरपंचायतीत 17 पैकी 12 जागा मिळवत शिवसेना -भाजपने सत्ता मिळवली. देवरुख नगरपंचायतीमध्ये 17 पैकी 12 जागांवर सेना-भाजप, 5 जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीला विजय मिळाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2013 11:54 AM IST

नगरपंचायत निवडणुकीत नारायण राणेंनी गड राखला

01 एप्रिल

कोकणात महसूल मंत्री नारायण राणे यांनी नगरपंचायत निवडणुकीत आपला गड शाबूत राखला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. नारायण राणे यांचा मतदारसंघ असलेल्या कणकवलीमध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. काँग्रेसला 17 पैकी 13 जागा मिळाल्या आहेत. गुहागर नगरपंचायतीत 17 पैकी 11 जागा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता मिळवलीय. तर सहा जागा शिवसेना-भाजपाकडे गेल्या आहेत. देवरूख नगरपंचायतीत 17 पैकी 12 जागा मिळवत शिवसेना -भाजपने सत्ता मिळवली. देवरुख नगरपंचायतीमध्ये 17 पैकी 12 जागांवर सेना-भाजप, 5 जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीला विजय मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2013 11:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close