S M L

'प्राध्यापकांनो, बहिष्कार मागे घ्या'

01 एप्रिलनवी दिल्ली : सीनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांच्या संपाचा आज 56वा दिवस आहे. आज दिल्लीत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री पल्लम राजू यांच्या बैठक झाली. यामध्ये संपावर तोडगा काढण्यासाठी चर्चा झाली. राज्य सरकारनं 500 कोटी लगेच दिले तर आम्ही 80 टक्के निधी देऊ, असं आश्वास पल्लम राजू यांनी दिलंय. या बैठकीनंतर पवार आणि राजू या दोघांनी प्राध्यापकांना आवाहन केलं. की त्यांनी परीक्षांवरचा बहिष्कार मागे घ्यावा. त्यामुळे आता लवकरच कोंडी फुटेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.विविध मागण्यासाठी 4 फेब्रुवारीपासून सिनिअर कॉलेज आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलाय. आज या बहिष्काराला 56 दिवस झाले आहे. मात्र यावर कोणताही तोडगा निघू न शकल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होतं आहे. अनेक विद्यापीठातील नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. मध्यंतरी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत प्राध्यापकांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. यामध्ये चालू वर्षांपासून बिगर नेट-सेट आणि पीएचडीधारकांना नियमित करण्यात आले. त्याचबरोबर प्राध्यापकांचे थकीत वेतन देण्यासाठी 1,500 कोटींची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर प्राध्यापकांना बहिष्कार मागे घेण्याची विनंती टोपे यांनी केली होती. मात्र प्राध्यापक संघटनेनं 1991 पासून बिगर नेट-सेट आणि पीएचडी धारकांना नियमित करावे अशी मागणी करत बहिष्कार मागे न घेण्याची भूमिका घेतली. पण सरकारने यावर कोणतेच उत्तर न दिल्यामुळे बहिष्कार चिघळला. यानंतर ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी बहिष्कार मागे घेऊन बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला. मात्र सिनिअर्स कॉलेजच्या प्राध्यापकांनी बहिष्कार कायम ठेवला. अखेरीस केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पुढाकार घेऊन बहिष्कारावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. आज दिल्लीत पवार आणि पल्लम राजू यांची यशस्वी बैठक पार पडली. त्यामुळे आता प्राध्यापकांच्या बहिष्कारावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2013 02:39 PM IST

'प्राध्यापकांनो, बहिष्कार मागे घ्या'

01 एप्रिल

नवी दिल्ली : सीनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांच्या संपाचा आज 56वा दिवस आहे. आज दिल्लीत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री पल्लम राजू यांच्या बैठक झाली. यामध्ये संपावर तोडगा काढण्यासाठी चर्चा झाली. राज्य सरकारनं 500 कोटी लगेच दिले तर आम्ही 80 टक्के निधी देऊ, असं आश्वास पल्लम राजू यांनी दिलंय. या बैठकीनंतर पवार आणि राजू या दोघांनी प्राध्यापकांना आवाहन केलं. की त्यांनी परीक्षांवरचा बहिष्कार मागे घ्यावा. त्यामुळे आता लवकरच कोंडी फुटेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

विविध मागण्यासाठी 4 फेब्रुवारीपासून सिनिअर कॉलेज आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलाय. आज या बहिष्काराला 56 दिवस झाले आहे. मात्र यावर कोणताही तोडगा निघू न शकल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होतं आहे. अनेक विद्यापीठातील नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. मध्यंतरी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत प्राध्यापकांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. यामध्ये चालू वर्षांपासून बिगर नेट-सेट आणि पीएचडीधारकांना नियमित करण्यात आले. त्याचबरोबर प्राध्यापकांचे थकीत वेतन देण्यासाठी 1,500 कोटींची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर प्राध्यापकांना बहिष्कार मागे घेण्याची विनंती टोपे यांनी केली होती.

मात्र प्राध्यापक संघटनेनं 1991 पासून बिगर नेट-सेट आणि पीएचडी धारकांना नियमित करावे अशी मागणी करत बहिष्कार मागे न घेण्याची भूमिका घेतली. पण सरकारने यावर कोणतेच उत्तर न दिल्यामुळे बहिष्कार चिघळला. यानंतर ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी बहिष्कार मागे घेऊन बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला. मात्र सिनिअर्स कॉलेजच्या प्राध्यापकांनी बहिष्कार कायम ठेवला. अखेरीस केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पुढाकार घेऊन बहिष्कारावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. आज दिल्लीत पवार आणि पल्लम राजू यांची यशस्वी बैठक पार पडली. त्यामुळे आता प्राध्यापकांच्या बहिष्कारावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2013 02:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close