S M L

आम आदमीच्या कार्यकर्त्यांचं 'एप्रिल फूल'

01 एप्रिलनवी दिल्ली : वीजदरवाढीविरोधात संतप्त झालेल्या आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते तावातावाने मुख्यमंत्री शिला दीक्षित यांच्या निवास्थानाकडे निघाले असता पोलिसांनी मध्येच अडवले आणि माघारी जाण्याचं सांगितलं पण कार्यकर्ते काही ऐकायला तयारच नाही. अखेरीस पोलिसांनी शक्कल लढवली. तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे भेटायला घेऊन जातो असं सांगून कार्यकर्त्यांना गाडीत भरलं आणि इंद्रप्रस्थ मेट्रो स्टेशनवर सोडल्याची 'एप्रिल फूल' घटना दिल्लीत घडली. आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल गेल्या दहा दिवसांपासून दिल्लीत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आम आदमी पार्टीच्यावतीने मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना वीज दरवाढीविरोधात 8 लाख हस्ताक्षरं असलेलं पत्र देण्यात येणार होतं. पण, मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटायला नकार दिला. त्यानंतर या रॅलीला प्रगती मैदानाजवळच रोखण्यात आलं. काही नेत्यांना ताब्यातही घेण्यात आलं. पण तरीही आम आदमी पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री निवासाकडे कूच केलं. तेव्हा पोलिसांनी या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटायला घेऊन जातो, असं सांगत इंद्रप्रस्थ मेट्रोस्टेशनजवळ सोडलं. पण, इथूनही काही कार्यकर्ते मुख्यमंत्री निवासापर्यंत पोचले. पण, त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू देण्यात आलं नाही. शिला दीक्षित यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात आमचा अंत पाहू नका असा इशारा केजरीवाल यांनी दिलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2013 05:25 PM IST

आम आदमीच्या कार्यकर्त्यांचं 'एप्रिल फूल'

01 एप्रिल

नवी दिल्ली : वीजदरवाढीविरोधात संतप्त झालेल्या आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते तावातावाने मुख्यमंत्री शिला दीक्षित यांच्या निवास्थानाकडे निघाले असता पोलिसांनी मध्येच अडवले आणि माघारी जाण्याचं सांगितलं पण कार्यकर्ते काही ऐकायला तयारच नाही. अखेरीस पोलिसांनी शक्कल लढवली. तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे भेटायला घेऊन जातो असं सांगून कार्यकर्त्यांना गाडीत भरलं आणि इंद्रप्रस्थ मेट्रो स्टेशनवर सोडल्याची 'एप्रिल फूल' घटना दिल्लीत घडली. आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल गेल्या दहा दिवसांपासून दिल्लीत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आम आदमी पार्टीच्यावतीने मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना वीज दरवाढीविरोधात 8 लाख हस्ताक्षरं असलेलं पत्र देण्यात येणार होतं. पण, मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटायला नकार दिला. त्यानंतर या रॅलीला प्रगती मैदानाजवळच रोखण्यात आलं. काही नेत्यांना ताब्यातही घेण्यात आलं. पण तरीही आम आदमी पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री निवासाकडे कूच केलं. तेव्हा पोलिसांनी या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटायला घेऊन जातो, असं सांगत इंद्रप्रस्थ मेट्रोस्टेशनजवळ सोडलं. पण, इथूनही काही कार्यकर्ते मुख्यमंत्री निवासापर्यंत पोचले. पण, त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू देण्यात आलं नाही. शिला दीक्षित यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात आमचा अंत पाहू नका असा इशारा केजरीवाल यांनी दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2013 05:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close