S M L

आघाडीच्या भांडणात ऑईलपंप पडले धूळ खात

02 एप्रिलनंदुरबार : येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भांडणात लाखो रुपयांचे ऑईलपंप आणि पाईप धूळ खात पडले आहेत. आदिवासी विकास खात्यातर्फे आदिवासी शेतकर्‍यांसाठी आॉईलपंप आणि पाईपलाईन देण्याची सुविधा आहे. त्यानुसार लाभाथीर्ंना प्रत्येकी 20 ते 25 हजार रुपयांचे हे पंप आणि पाईप मंजूर झालेत. मात्र हे लाभार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत की, राष्ट्रवादीचे या राजकीय वादात हे साहित्य गोडाऊनमध्येच धूळ खात पडलंय. विशेष म्हणजे खरे पात्र लाभार्थी आहेत त्यांना 2009 पासून हे साहित्य मंजूर होऊन मिळालेलं नाही. ज्यांना मिळालंय त्यांच्याकडे शेतीच नसल्याचा तलाठ्यांचाच अहवाल आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 2, 2013 10:15 AM IST

आघाडीच्या भांडणात ऑईलपंप पडले धूळ खात

02 एप्रिल

नंदुरबार : येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भांडणात लाखो रुपयांचे ऑईलपंप आणि पाईप धूळ खात पडले आहेत. आदिवासी विकास खात्यातर्फे आदिवासी शेतकर्‍यांसाठी आॉईलपंप आणि पाईपलाईन देण्याची सुविधा आहे. त्यानुसार लाभाथीर्ंना प्रत्येकी 20 ते 25 हजार रुपयांचे हे पंप आणि पाईप मंजूर झालेत. मात्र हे लाभार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत की, राष्ट्रवादीचे या राजकीय वादात हे साहित्य गोडाऊनमध्येच धूळ खात पडलंय. विशेष म्हणजे खरे पात्र लाभार्थी आहेत त्यांना 2009 पासून हे साहित्य मंजूर होऊन मिळालेलं नाही. ज्यांना मिळालंय त्यांच्याकडे शेतीच नसल्याचा तलाठ्यांचाच अहवाल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2013 10:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close