S M L

रिझर्व्ह बँकेजवळ गोळीबार, तरूण अटकेत

02 एप्रिलमुंबई : इथं फोर्ड परिसरातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयाच्या गेटवर एका तरूणानं गोळीबार केला. पद्मगिरी राज शेखर असं त्याचं नाव आहे. 27 वर्षांचा पद्मगिरी जबरदस्तीनं गेटच्या आत घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्याला रोखलं असता त्यानं त्याच्याजवळ असलेल्या एअर गननं हवेत गोळीबार केला. यात कुणीही जखमी झालेलं नाही. पोलिसांनी पद्मगिरीला अटक केलीय. रिझर्व्ह बँकेत पद्मगिरीने घुसण्याचा प्रयत्न का केला हे अजून कळू शकले नाही. पण रिझर्व्ह बँकेच्या आवारात घडलेल्या या प्रकारमुळे एकच खळबळ उडाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 2, 2013 01:15 PM IST

रिझर्व्ह बँकेजवळ गोळीबार, तरूण अटकेत

02 एप्रिल

मुंबई : इथं फोर्ड परिसरातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयाच्या गेटवर एका तरूणानं गोळीबार केला. पद्मगिरी राज शेखर असं त्याचं नाव आहे. 27 वर्षांचा पद्मगिरी जबरदस्तीनं गेटच्या आत घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्याला रोखलं असता त्यानं त्याच्याजवळ असलेल्या एअर गननं हवेत गोळीबार केला. यात कुणीही जखमी झालेलं नाही. पोलिसांनी पद्मगिरीला अटक केलीय. रिझर्व्ह बँकेत पद्मगिरीने घुसण्याचा प्रयत्न का केला हे अजून कळू शकले नाही. पण रिझर्व्ह बँकेच्या आवारात घडलेल्या या प्रकारमुळे एकच खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2013 01:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close