S M L

प्राध्यापकांचे 1,500 कोटी थकीत वेतन देणार -टोपे

02 एप्रिलमुंबई : येत्या मे अखेरपर्यंत सीनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांची 1500 कोटी रुपयांची थकीत देणी देण्यात येणार आहे अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत केली. पण नेट-सेट नसलेल्या प्राध्यापकांना सर्व लाभ सुरुवातीपासून द्यावेत ही प्राध्यापकांची मागणी मात्र सरकारने अमान्य केली आहेत. कॅबिनेटचा निर्णय झाल्यापासून नेट-सेट नसलेल्या प्राध्यापकांना थकीत रक्कम दिली जाणार आहे. प्राध्यापकांच्या बहिष्काराला 57 दिवस झाले आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी याबद्दल मध्यस्ती करून बहिष्कार मागे घ्यावे असं आवाहन केलं होतं पण प्राध्यापकांनी आपला बहिष्कार अजूनही मागे घेतला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 2, 2013 02:36 PM IST

प्राध्यापकांचे 1,500 कोटी थकीत वेतन देणार -टोपे

02 एप्रिल

मुंबई : येत्या मे अखेरपर्यंत सीनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांची 1500 कोटी रुपयांची थकीत देणी देण्यात येणार आहे अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत केली. पण नेट-सेट नसलेल्या प्राध्यापकांना सर्व लाभ सुरुवातीपासून द्यावेत ही प्राध्यापकांची मागणी मात्र सरकारने अमान्य केली आहेत. कॅबिनेटचा निर्णय झाल्यापासून नेट-सेट नसलेल्या प्राध्यापकांना थकीत रक्कम दिली जाणार आहे. प्राध्यापकांच्या बहिष्काराला 57 दिवस झाले आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी याबद्दल मध्यस्ती करून बहिष्कार मागे घ्यावे असं आवाहन केलं होतं पण प्राध्यापकांनी आपला बहिष्कार अजूनही मागे घेतला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2013 02:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close