S M L

'MPSCची परीक्षा वेळेतच होणार'

03 एप्रिलरविवारी होणार MPSCची परीक्षा पूर्वनियोजित वेळेप्रमाणेच म्हणजे 7 एप्रिलला होणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याचं कारण नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे. विधानपरिषेदत औचित्याच्या मुद्यावरुन निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलीय. फी भरतानाची पावती दाखवून उमेदवारांना परीक्षेला बसता येईल आणि बैठक क्रमांक आणि परीक्षा केंद्र याची माहिती SMSद्वारे उमेदवारांना कळवली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. शिवाय MPSCच्या वेबसाईटवर आणि प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्येही याबाबतची माहिती उपलब्ध असणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याची आवश्यकता नाही, असं आयोगाचं मत असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. पण आमदार दीपक सावंत यांनी दावा केलाय की, परीक्षा पुढे ढकलण्याचा पर्याय अजूनही मुख्यमंत्र्यांनी खुला ठेवलाय. त्यामुळे अजूनही गोंधळाचं वातावरण कायम आहे. दरम्यान, परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात या मागणीसाठी मुंबईमध्ये मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हातात फारच कमी कालावधी उरला असल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी या दोन्ही पक्षांनी केली. विद्यार्थ्यांनीसुद्धा MPSC ला कळकळीचं आवाहन केलंय की परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती केली. तर दुसरीकडे MPSC च्या भोंगळ कारभाराविरूध्द पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेनं आंदोलन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत परीक्षा पुढं ढकलण्याची मागणी केली. निवासी जिल्हाधिकारी अनिल पवार यांना कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2013 03:03 PM IST

'MPSCची परीक्षा वेळेतच होणार'

03 एप्रिल

रविवारी होणार MPSCची परीक्षा पूर्वनियोजित वेळेप्रमाणेच म्हणजे 7 एप्रिलला होणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याचं कारण नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे. विधानपरिषेदत औचित्याच्या मुद्यावरुन निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलीय. फी भरतानाची पावती दाखवून उमेदवारांना परीक्षेला बसता येईल आणि बैठक क्रमांक आणि परीक्षा केंद्र याची माहिती SMSद्वारे उमेदवारांना कळवली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. शिवाय MPSCच्या वेबसाईटवर आणि प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्येही याबाबतची माहिती उपलब्ध असणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याची आवश्यकता नाही, असं आयोगाचं मत असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. पण आमदार दीपक सावंत यांनी दावा केलाय की, परीक्षा पुढे ढकलण्याचा पर्याय अजूनही मुख्यमंत्र्यांनी खुला ठेवलाय. त्यामुळे अजूनही गोंधळाचं वातावरण कायम आहे.

दरम्यान, परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात या मागणीसाठी मुंबईमध्ये मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हातात फारच कमी कालावधी उरला असल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी या दोन्ही पक्षांनी केली. विद्यार्थ्यांनीसुद्धा MPSC ला कळकळीचं आवाहन केलंय की परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती केली. तर दुसरीकडे MPSC च्या भोंगळ कारभाराविरूध्द पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेनं आंदोलन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत परीक्षा पुढं ढकलण्याची मागणी केली. निवासी जिल्हाधिकारी अनिल पवार यांना कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 3, 2013 12:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close