S M L

अल्पसंख्यांकांचा विकासनिधी खर्चाविना पडून

प्रशांत कोरटकर 26 डिसेंबर, नागपूर राज्यातल्या गरीब अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात 167 कोटी रुपये राखून ठेवले आहेत. नऊ महिने उलटून गेल्यानंतरही राखून ठेवलेल्या निधीपैकी एकाही पैसा खर्च करण्यात आलेला नाहीये. त्यात राज्यातल्या गरीब अल्पसंख्यांकांना निधीबाबत काहीच कल्पना नाहीये. त्यामुळे या निधीचं पुढे काय होणार आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्रामधल्या अल्पसंख्यांकांसाठी सराकाने राज्याच्या अर्थसंकल्पात 167 कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. या निधीबाबत राज्यातल्या हमीद मोहम्मद सारख्या कित्येक अल्पसंख्यांकांना कल्पनाच नाहीये. हमीद मोहम्मद यांचा नागपूरच्या मोमीनपुरा भागात राहतात. 70 वर्षांचे हमीद मोहम्मद अजूनही रोजंदारीची कामं करून पोट भरत आहेत. " मी साफ थकलो आहे. जेवढं कमलं ते आजारपणात आणि कुटुंबाच्या निर्वाहासाठी खर्च केलं आहे. आमच्यासारख्या गरिबांच्या कल्याणासाठी सरकारनं काही निधी राखून ठेवला आहे हेच आम्हाला ठाऊक नाही आहे. पोटासाठी मरेपर्यंत काम करावं लागणार आहे, " हे हमीद मोहम्मद यांचं म्हणणं आहे.राज्यातल्या गरीब अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी असणा-या निधीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद होतात. राज्य सरकारमध्ये अनिस अहमद, नवाब मलिक यांच्यासारखे दिग्गज मंत्री आहेत. अल्पसंख्यांकांसाठी असलेला पैसा का खर्च झाला नाही याचं समाधानकारक उत्तर त्यांच्याकडं नाहीये. " येत्या 31 मार्च पर्यंत ते पैसे योग्य त्या ठिकाणी खर्च होतील. तर आगामी बजेटमध्ये अर्थसंकल्पात अल्पसंख्यांकांसाठी थोड्या जास्त पैशांची तरतूद करू, " असं कामगार मंत्री नवाब मलिक म्हणाले. " काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुसलमानांच्या उद्धारासाठी काहीच करणार नाहीत हे या अल्पसंख्यांकांच्या निधीवरून लक्षात आलं आहे. हे त्यांचं ज्वलंत असं उदाहरण आहे. मग तो प्रश्न बजेटमधल्या निधीचा असो की, जमीन वाटपाचा असो, प्रश्न मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा असो की नोकरीचा या सगळ्याच बाबतीत राज्यसरकार उदासीन आहेत, " असं मत भाजपचेआमदार पाशा पटेल यांचं आहे. राज्य सरकारच्या चालू बजेटमध्ये अनेक विभागांचा खर्च 35 टक्यांपेक्षा कमी झाला आहे. मात्र याची आयएएस अधिकारी आणि मंत्री यापैकी कुणालाच चिंता नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 26, 2008 06:51 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 26, 2008 06:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close