S M L

मनमोहन सिंग VS मोदी असा सामना व्हावा !

03 एप्रिलनवी दिल्ली : सोनिया गांधी-मनमोहन सिंग मॉडेल यशस्वी ठरल्याचं वक्तव्य करत काँग्रेस सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी मनमोहन सिंग हे तिसर्‍यांदा पंतप्रधान होतील, असे संकेत दिले होते. आयबीएन नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार आगामी लोकसभा निवडणूक ही राहुल विरुद्ध मोदी अशी न लढता मनमोहन विरुद्ध मोदी अशीच लढावी अशी पक्षातल्या अनेकांची इच्छा आहे. तर मनमोहन सिंग यांनाच तिसर्‍यांदा पंतप्रधानपदी विराजमान करायला सोनिया गांधींचीही ना नाही अशीही माहिती सूत्रांकडून मिळतेय. दरम्यान, दोन सत्ताकेंद्रांमुळे पक्षाचं नुकसान होत असल्याच्या आपल्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचं पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. काँग्रेस सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी मनमोहन सिंग पंतप्रधान आणि सोनिया गांधी या काँग्रेस अध्यक्ष हा सत्तेचा फॉर्म्युला येत्या निवडणुकीनंतरही कायम राहू शकतो असं अत्यंत महत्त्वाचं विधान केलं होतं. सत्तेची दोन केंद्रं करणारा हा फॉर्म्युला पक्षाचं खूप नुकसान करतोय असं वक्तव्य काँग्रेसचे आणखी एक सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी नुकतच केलं होतं. त्यानंतर द्विवेदी यांनी आज काँग्रेसची ही अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी पेपरला मुलाखत देताना दोन सत्ताकेंद्रांमुळे निर्णय प्रक्रीयेवर परिणाम होतो. यामुळे पक्षाचंही नुकसान होतं असं दिग्विजय सिंगांचं म्हणणं आहे. त्यामुळे येत्या काळात राहुल गांधी यांना पंतप्रधान पदासोबत काँग्रेस अध्यक्षपदंही सोपवलं जावं असं दिग्विजय यांना म्हणायचं आहे अशी चर्चा होती. त्याचवेळी काँग्रेस पक्षामध्ये सध्या मनमोहन सिंग सरकारबद्दल नाराजी आहे त्याला दिग्विजय यांनी तोंड फोडलं असंही मानलं गेलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 3, 2013 05:41 PM IST

मनमोहन सिंग VS मोदी असा सामना व्हावा !

03 एप्रिल

नवी दिल्ली : सोनिया गांधी-मनमोहन सिंग मॉडेल यशस्वी ठरल्याचं वक्तव्य करत काँग्रेस सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी मनमोहन सिंग हे तिसर्‍यांदा पंतप्रधान होतील, असे संकेत दिले होते. आयबीएन नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार आगामी लोकसभा निवडणूक ही राहुल विरुद्ध मोदी अशी न लढता मनमोहन विरुद्ध मोदी अशीच लढावी अशी पक्षातल्या अनेकांची इच्छा आहे. तर मनमोहन सिंग यांनाच तिसर्‍यांदा पंतप्रधानपदी विराजमान करायला सोनिया गांधींचीही ना नाही अशीही माहिती सूत्रांकडून मिळतेय. दरम्यान, दोन सत्ताकेंद्रांमुळे पक्षाचं नुकसान होत असल्याच्या आपल्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचं पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलंय.

काँग्रेस सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी मनमोहन सिंग पंतप्रधान आणि सोनिया गांधी या काँग्रेस अध्यक्ष हा सत्तेचा फॉर्म्युला येत्या निवडणुकीनंतरही कायम राहू शकतो असं अत्यंत महत्त्वाचं विधान केलं होतं. सत्तेची दोन केंद्रं करणारा हा फॉर्म्युला पक्षाचं खूप नुकसान करतोय असं वक्तव्य काँग्रेसचे आणखी एक सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी नुकतच केलं होतं. त्यानंतर द्विवेदी यांनी आज काँग्रेसची ही अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी पेपरला मुलाखत देताना दोन सत्ताकेंद्रांमुळे निर्णय प्रक्रीयेवर परिणाम होतो. यामुळे पक्षाचंही नुकसान होतं असं दिग्विजय सिंगांचं म्हणणं आहे. त्यामुळे येत्या काळात राहुल गांधी यांना पंतप्रधान पदासोबत काँग्रेस अध्यक्षपदंही सोपवलं जावं असं दिग्विजय यांना म्हणायचं आहे अशी चर्चा होती. त्याचवेळी काँग्रेस पक्षामध्ये सध्या मनमोहन सिंग सरकारबद्दल नाराजी आहे त्याला दिग्विजय यांनी तोंड फोडलं असंही मानलं गेलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 3, 2013 05:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close