S M L

कोलकाता नाईट रायडर्सची विजयी सलामी

03 एप्रिलकोलकाता : आयपीएलच्या पाचव्या हंगामाची चॅम्पियन टीम कोलकाता नाईट रायडर्सनं सहाव्या हंगामाची सुरुवातही अगदी दणक्यात केली आहे. सलामीच्या लढतीत नाईट रायडर्सनं दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 6 विकेटनं पराभव केला. पण दिल्लीनं विजयासाठी ठेवलेलं 129 रन्सचं आव्हान पार करताना कोलकाताही चांगलीच लढत द्यावी लागली. नाईट रायडर्सनं टॉस जिंकून दिल्लीला पहिली बॅटिंग दिली आणि मॅचच्या पहिल्याच बॉलवर ब्रेट लीनं उन्मुक्त चंदला आऊट करत दिल्लीला पहिला धक्का दिला. यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि महेला जयवर्धनेनं इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला. पण नरिननं वॉर्नरचा अडथळा दूर करत दिल्लीला दुसरा धक्का दिला. यानंतर जयवर्धने वगळता दिल्लीचे इतर बॅट्समन नरिनच्या बॉलिंगसमोर सपशेल ढेपाळले. याला उत्तर देताना नाईट रायडर्सची सुरुवातही खराब झाली. ओपनिंगला आलेला मनविंदर बिस्ला 4 रन्स करुन आऊट झाला. तर कॅलिसनं 23 रन्स केले. पण गौतम गंभीरनं कॅप्टन इनिंग खेळत कोलकाता नाईट रायडर्सला पहिला विजय मिळवून दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 3, 2013 05:58 PM IST

कोलकाता नाईट रायडर्सची विजयी सलामी

03 एप्रिल

कोलकाता : आयपीएलच्या पाचव्या हंगामाची चॅम्पियन टीम कोलकाता नाईट रायडर्सनं सहाव्या हंगामाची सुरुवातही अगदी दणक्यात केली आहे. सलामीच्या लढतीत नाईट रायडर्सनं दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 6 विकेटनं पराभव केला. पण दिल्लीनं विजयासाठी ठेवलेलं 129 रन्सचं आव्हान पार करताना कोलकाताही चांगलीच लढत द्यावी लागली. नाईट रायडर्सनं टॉस जिंकून दिल्लीला पहिली बॅटिंग दिली आणि मॅचच्या पहिल्याच बॉलवर ब्रेट लीनं उन्मुक्त चंदला आऊट करत दिल्लीला पहिला धक्का दिला. यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि महेला जयवर्धनेनं इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला. पण नरिननं वॉर्नरचा अडथळा दूर करत दिल्लीला दुसरा धक्का दिला. यानंतर जयवर्धने वगळता दिल्लीचे इतर बॅट्समन नरिनच्या बॉलिंगसमोर सपशेल ढेपाळले. याला उत्तर देताना नाईट रायडर्सची सुरुवातही खराब झाली. ओपनिंगला आलेला मनविंदर बिस्ला 4 रन्स करुन आऊट झाला. तर कॅलिसनं 23 रन्स केले. पण गौतम गंभीरनं कॅप्टन इनिंग खेळत कोलकाता नाईट रायडर्सला पहिला विजय मिळवून दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 3, 2013 05:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close