S M L

राज्याच्या सुरक्षेसाठी सरकार सज्ज

26 डिसेंबर, मुंबईअमेय तिरोडकरभारताची सागरी सीमा कमजोर असल्याचं नेहमी म्हटलं गेलं आहे. 26 नोव्हेंबरचा हल्ला नेमका सागरी मार्गानंच झाला. या हल्लानंतर सगळ्यात अगोदर सागरी सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलं आहे. 26 / 11च्या भीषण हल्ल्यामुळं भारताच्या सुरक्षा यंत्रणेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.राज्य सरकारने राज्य पोलिस दलाला अत्याधुनिक हत्यारे देण्यासाठी 127 कोटींच्या निधीची घोषणा केली आहे. मुंबईवरील हल्ल्याला एक महिना पूर्ण झाला आहे. सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे हा हल्ला झाला. त्यामुळे या यंत्रणा सक्षम करण्यासाठी जोरदार पावलं उचलण्यात येत आहेत. कस्टम विभागाला पस्तीस नव्या बोटी देण्यात आल्या आहेत.. याशिवाय राज्य सरकारने राज्य पोलिस दलाला अत्याधुनिक हत्यारे देण्यासाठी 127 कोटींच्या निधीची घोषणा केली. हा निधी नवी बुलेटप्रूफ जॅकेट्स, एके 47 बंदुका यांसाठीही वापरण्यात येणार आहेत. ताजचा हल्ला मोडून काढला तो एनएसजीच्या जवानांनी. त्यामुळे राज्यातही त्याच्या तोडीचं फोर्स वन स्थापन करण्यात येईल, याची घोषणाही सरकारकेलीय आहे. फोर्स वन या दलाला आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मदत लागणार आहे. ती मदतही या दलाला उपलब्ध करून दिली जाणार आहे. या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून विलासराव आणि आर. आर. पाटील यांना राजीनामा द्यावा लागला. अशीच जबाबदारी पोलीस अधिकार्‍यांनी, सचिवांनी स्वीकारावी यासाठी दबाव वाढला होता. आता पोलीस महासंचालक ए.एन.रॉय आणि आयुक्त हसन गफूर यांच्या चौकशशीचे आदेश सरकारला द्यावे लागले आहेत. " पोलीस अधिका-यांची चौकशी होणार आहे. त्या चौकशीत अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण चव्हाणांनी विधान परिषदेत म्हणाले. याशिवाय राज्यातल्या नेत्यांना देण्यात येणार्‍या सुरक्षा व्यवस्थेची माहितीही गृहमंत्री जयंत पाटील यांनी मागवली आहे. त्यातून अनावश्यक तिथे सुरक्षा काढली जाईल असंही सांगितलं जातं आहे. 26 / 11 नंतर सरकाराने सुरक्षाव्यवस्थेबाबत कडक पाऊलं उचलंली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 26, 2008 06:53 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 26, 2008 06:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close