S M L

मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक -अजित पवार

04 एप्रिलमुंबई : मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत आश्वासन दिलंय. यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या नारायण राणे समितीच्या अहवालानंतर निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामकार युनियानच्या वतीने मस्जिद बंदर ते आझाद मैदान मोर्चाचं आयोजन केलं. हा मोर्चा आझाद मैदानात थांबला आणि तिथे जाहीर सभेला सुरुवात झाली. या मोर्चाचं नेतृत्व छत्रपती संभाजीराजे आणि माथाडी युनियनचे नेते नरेंद्र पाटील यांनी केलं. मराठा समाजाच्या मागण्या सरकारदरबारी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. आणि या मुद्याचा वापर फक्त मतांच्य गणितासाठी केला जातो असा आरोप मराठा संघटनांनी केलाय. यापुढे समित्या नको तर निर्णय घ्या अशी मागणी करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2013 10:45 AM IST

मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक -अजित पवार

04 एप्रिल

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत आश्वासन दिलंय. यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या नारायण राणे समितीच्या अहवालानंतर निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामकार युनियानच्या वतीने मस्जिद बंदर ते आझाद मैदान मोर्चाचं आयोजन केलं. हा मोर्चा आझाद मैदानात थांबला आणि तिथे जाहीर सभेला सुरुवात झाली. या मोर्चाचं नेतृत्व छत्रपती संभाजीराजे आणि माथाडी युनियनचे नेते नरेंद्र पाटील यांनी केलं. मराठा समाजाच्या मागण्या सरकारदरबारी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. आणि या मुद्याचा वापर फक्त मतांच्य गणितासाठी केला जातो असा आरोप मराठा संघटनांनी केलाय. यापुढे समित्या नको तर निर्णय घ्या अशी मागणी करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2013 10:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close