S M L

पाकच्या उलट्या बोंबा

26 डिसेंबरसूची यादवमुंबई दहशतवादी हल्ल्यावरून जगाचं लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहे. लाहोरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी एका भारतीय नागरिकाला अटक केल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. टेलिफोन संभाषणाच्या आधारे गुप्तचर संस्थांनी ही अटक केल्याचं पाकिस्तानमधल्या टीव्ही चॅनल्सनी म्हटलं आहे. या भारतीय नागरिकाचं नाव मुनीर उर्फ सतीश आनंद शुक्ला आहे. आणि तो कोलकात्याचा रहिवासी आहे, असा दावाही करण्यात आला आहे. पण, पाकिस्तानकडून याबाबत अधिकृत माहिती मिळाली नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. लाहोरमधल्या कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या सरकारी निवासस्थानाजवळ काल स्फोट झाला होता. त्यात 1 जण ठार झाला होता. त्याचबरोबर पाकिस्ताननं भारताच्या राजकीय दबावाला त्याच भाषेत उत्तर द्यायचं ठरवलंय. यासाठी पाकिस्तान आपले दूत जगातल्या महत्त्वाच्या देशांच्या राजधान्यांमध्ये पाठवणार आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानी लष्कराच्या हालचाली वाढल्याचं समजतंय.पंतप्रधान मनमोहन सिंग दबावाखाली आहेत, असं पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी म्हटलंय. पण भारतानं उगीच तणाव निर्माण करून नये असा सल्ला त्यांनी दिलाय. पाकिस्तानचे पंतप्रधान गिलानी काही आगऴीक झाली, तर मोठं युद्ध होईल अशी भाषा करतायत. " भारतावर जनेतचा दाबव आहे म्हणून हे सगळं चालू आहे. आमचे एकमेकांशी खूप चांगले सबंध आहेत, असं युसुफ रझा गिलानी यांचं मत आहे. भारताच्या मते, मुख्य मुद्द्याची दिशाभूल करण्याचा हा पाकचा प्रयत्न आहे. आणि अजमल् कसाबबद्दल पुरावे देउनही तोंड फिरवणारे पाकिस्तानी नेते अतिरेक्यांवर कारवाई करण्यात चालढकलचं करत आहेत. तसंच अगदी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांच्या ठाम सांगण्यानंतरही आता इतर पाकिस्तानी नेतेही , पाक सरकारचीच री ओढत आहेत. मुख्य म्हणजे एकमेकांच्या जिवावर उठणारे नेते आता भारताच्या विरुद्धात उभे राहिले आहेत. " भारत पाकवर करत असणारे आरोप योग्स नाही आहेत, असं पाकिस्तानी उलेमा नेता मुफ्ती मुनीर उर रेहमान यांचं म्हणणं आहे. पाक दहशतवादाला खतपाणी घालणार नाही, असं पाकिस्तानी नेता शाहबाज शरीफ ठामपणे म्हणाले. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत पाकचं रक्षण करू, असं पाकचे प्रधानमंत्री आसिफ अली झरादारी म्हणत आहेत. शिवाय ही सगळी नाटकं पाकच्या टीव्हीवरूनही दाखवण्यात आली होती. कितीही नखं लपवून गवत खायचा प्रयत्न केला, तरी सगळ्या जगाला मात्र पाकिस्तानचं खरं रूप माहिती आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 26, 2008 07:39 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 26, 2008 07:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close