S M L

MPSC च्या गोंधळात 'दादा' पास,'बाबा' नापास !

04 एप्रिलमुंबई : गेल्या तीन दिवसांपासून MPSC ची वेबसाईट व्हायरसमुळे करप्ट झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. एकीकडे विद्यार्थी रिक्वेस्ट करून दमले तर दुसरीकडे फॉर्म भरला जात नसल्यामुळे वैतागले. त्यात मुख्यमंत्र्यांनी 7 एप्रिलला परीक्षा होणारच अशी घोषणा करून विद्यार्थ्यांची आशा अपेक्षा संपुष्टात आणली. आज शेवटच्या दिवशी अजित पवारांनी गोंधळाचा समाचार घेत परीक्षा पुढे ढकलली तर कोणत आभाळ कोसळणार आहे ? सवाल करून मुख्यमंत्र्यांना कोंडीत पाडलं.एकीकडे उपमुख्यमंत्री, विरोधक आणि विद्यार्थी तर दुसरीकडे मुख्यमंत्री, एमपीएससी असा गट पडल्यामुळे मुख्यमंत्री गटाला माघार घ्यावी लागली. आणि परीक्षा पुढे ढकलावी लागली.तीन दिवसांपुर्वी महाराष्ट्र सेवा आयोग अर्थात MPSC ची वेबसाईट व्हायरसमुळे करप्ट झाल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून गोंधळ उडाला होता तो अखेर शमला आहे. पण आज या गोंधळाच्या मुद्द्यावरही काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळालं. परीक्षा पुढे ढकला, अशी मागणी परीक्षार्थी करत असताना परीक्षा वेळेवरच होणार अशी भूमिका काल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळात घेतली. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र परीक्षा वेळेवर घेण्याचा अट्टहास का ? परीक्षा पुढे ढकलली तर कोणतं आभाळ कोसळणार आहे असं बोचरं विधान करून मुख्यमंत्र्यांची कोंडी केली. खरं तर, MPSC हा आयोग मुख्यमंत्र्यांच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे त्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यातल्या तांत्रिक अडचणींचा विचार केला. पण अजित दादांनी मात्र परीक्षाथीर्ंच्या मनाचा कौल पाहिला. आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्णयापासून अंतर राखलं. अखेरीस, एकीकडे परीक्षार्थी दुसरीकडे विरोधक आणि तिसरीकडे राष्ट्रवादी.. या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडलं. त्यामुळे विरोधकांबरोबरच्या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णय त्यांना घ्यावा लागला. 7 एप्रिल रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. मुख्यमंत्री आणि विरोधकांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता पुढील परीक्षेची तारीख ही एमपीएसीच्या माध्यमातून जाहीर केली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 12 मे रोजी ही परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर उद्या 5 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फॉर्म भरण्याची मुभा देण्यात आली आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत होती पण दीड लाख विद्यार्थ्यांचं फॉर्म भरणं बाकी आहे. 2 तासात दीड लाख विद्यार्थी फॉर्म भरण्याचे बाकी असल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली. परीक्षा पुढे ढकल्यामुळे विद्यार्थांना मोठा दिलासा मिळाला खरा पण या गोंधळाच्या परीक्षेत' दादा पास झाले आणि बाबा नापास झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2013 03:04 PM IST

MPSC च्या गोंधळात 'दादा' पास,'बाबा' नापास !

04 एप्रिल

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून MPSC ची वेबसाईट व्हायरसमुळे करप्ट झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. एकीकडे विद्यार्थी रिक्वेस्ट करून दमले तर दुसरीकडे फॉर्म भरला जात नसल्यामुळे वैतागले. त्यात मुख्यमंत्र्यांनी 7 एप्रिलला परीक्षा होणारच अशी घोषणा करून विद्यार्थ्यांची आशा अपेक्षा संपुष्टात आणली. आज शेवटच्या दिवशी अजित पवारांनी गोंधळाचा समाचार घेत परीक्षा पुढे ढकलली तर कोणत आभाळ कोसळणार आहे ? सवाल करून मुख्यमंत्र्यांना कोंडीत पाडलं.एकीकडे उपमुख्यमंत्री, विरोधक आणि विद्यार्थी तर दुसरीकडे मुख्यमंत्री, एमपीएससी असा गट पडल्यामुळे मुख्यमंत्री गटाला माघार घ्यावी लागली. आणि परीक्षा पुढे ढकलावी लागली.

तीन दिवसांपुर्वी महाराष्ट्र सेवा आयोग अर्थात MPSC ची वेबसाईट व्हायरसमुळे करप्ट झाल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून गोंधळ उडाला होता तो अखेर शमला आहे. पण आज या गोंधळाच्या मुद्द्यावरही काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळालं. परीक्षा पुढे ढकला, अशी मागणी परीक्षार्थी करत असताना परीक्षा वेळेवरच होणार अशी भूमिका काल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळात घेतली. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र परीक्षा वेळेवर घेण्याचा अट्टहास का ? परीक्षा पुढे ढकलली तर कोणतं आभाळ कोसळणार आहे असं बोचरं विधान करून मुख्यमंत्र्यांची कोंडी केली.

खरं तर, MPSC हा आयोग मुख्यमंत्र्यांच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे त्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यातल्या तांत्रिक अडचणींचा विचार केला. पण अजित दादांनी मात्र परीक्षाथीर्ंच्या मनाचा कौल पाहिला. आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्णयापासून अंतर राखलं. अखेरीस, एकीकडे परीक्षार्थी दुसरीकडे विरोधक आणि तिसरीकडे राष्ट्रवादी.. या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडलं. त्यामुळे विरोधकांबरोबरच्या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णय त्यांना घ्यावा लागला. 7 एप्रिल रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. मुख्यमंत्री आणि विरोधकांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता पुढील परीक्षेची तारीख ही एमपीएसीच्या माध्यमातून जाहीर केली जाणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 12 मे रोजी ही परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर उद्या 5 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फॉर्म भरण्याची मुभा देण्यात आली आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत होती पण दीड लाख विद्यार्थ्यांचं फॉर्म भरणं बाकी आहे. 2 तासात दीड लाख विद्यार्थी फॉर्म भरण्याचे बाकी असल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली. परीक्षा पुढे ढकल्यामुळे विद्यार्थांना मोठा दिलासा मिळाला खरा पण या गोंधळाच्या परीक्षेत' दादा पास झाले आणि बाबा नापास झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2013 03:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close