S M L

'व्यापार्‍यांनो, बंद मागे घ्या अन्यथा कारवाईला तयार राहा'

06 एप्रिल1 एप्रिलपासून पुण्यातल्या व्यापार्‍यांनी LBT विरोधात बेमुदत बंद पुकारला. हा संप मागे घ्या, नाहीतर कडक कारवाई करू असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिलाय. यासाठी आयुक्तांनी 3 वाजेपर्यंत मुदत दिली. कारवाईसाठी विशेष पथकांची स्थापनाही करण्यात आली आहेत. गेल्या सहा दिवसांपासून एलबीटी विरोधात व्यापार्‍यांनी बंद पुकारला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज व्यापारी संघटनांसोबत पुणे आयुक्तांची बैठक झाली त्यात त्यांनी हा इशारा दिला. छोट्या व्यापार्‍यांना एलबीटीच्या तरतुदीतून वगळा, अशी मागणी व्यापार्‍यांनी केलीय. तसंच वॅटवर 1 टक्का सरचार्ज लावला तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमधून 2000 कोटी रूपयाचं उत्पन्न महापालिकांना मिळेल जे जकातीच्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे तेव्हा हा पर्याय स्वीकारावं अशीही मागणी व्यापार्‍यांनी केली आहे. मात्र सहा दिवसांपासून पुकारलेल्या बंदमुळे सामान्य नागरिकांना या बंदचा फटका बसलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 01:46 PM IST

'व्यापार्‍यांनो, बंद मागे घ्या अन्यथा कारवाईला तयार राहा'

06 एप्रिल

1 एप्रिलपासून पुण्यातल्या व्यापार्‍यांनी LBT विरोधात बेमुदत बंद पुकारला. हा संप मागे घ्या, नाहीतर कडक कारवाई करू असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिलाय. यासाठी आयुक्तांनी 3 वाजेपर्यंत मुदत दिली. कारवाईसाठी विशेष पथकांची स्थापनाही करण्यात आली आहेत. गेल्या सहा दिवसांपासून एलबीटी विरोधात व्यापार्‍यांनी बंद पुकारला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज व्यापारी संघटनांसोबत पुणे आयुक्तांची बैठक झाली त्यात त्यांनी हा इशारा दिला. छोट्या व्यापार्‍यांना एलबीटीच्या तरतुदीतून वगळा, अशी मागणी व्यापार्‍यांनी केलीय. तसंच वॅटवर 1 टक्का सरचार्ज लावला तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमधून 2000 कोटी रूपयाचं उत्पन्न महापालिकांना मिळेल जे जकातीच्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे तेव्हा हा पर्याय स्वीकारावं अशीही मागणी व्यापार्‍यांनी केली आहे. मात्र सहा दिवसांपासून पुकारलेल्या बंदमुळे सामान्य नागरिकांना या बंदचा फटका बसलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2013 09:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close