S M L

इमारत दुर्घटनेला कारणीभूत बिल्डर अटकेत

06 एप्रिलठाणे जिल्ह्यात शिळफाटा इमारत दुर्घटनेप्रकरणात दोन्ही बिल्डरला अटक करण्यात आली आहेत. ठाणे क्राईम ब्रँचनं ही अटक केली. जमील कुरेशीला दिल्लीतून, तर सलीम शेखला ठाण्यातून अटक करण्यात आलीय. या इमारतीच्या बिल्डरच्या विरोधात अगोदरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही बिल्डर पैकी सलीम शेखला गुरूवारी क्राईम ब्रँचनं अटक केली. दुर्घटनास्थळावरचं मदतकार्य आज दुपारी एक वाजेपर्यंत सुरु होतं. तब्बल 42 तास चाललेल्या या बचावकामात 73 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यात 62 जण जखमी झालेत. जखमींवर ठाण्यातील शिवाजी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये 26 पुरुष, 20 महिला, 11 मुलं आणि 15 मुलींचा समावेश आहे. जी इमारत दुर्घटनाग्रस्त झालीय, तिचं साहित्य तपासणीसाठी पाठवण्यात आलंय. या इमारतीसाठी वापरण्यात आलेल्या विटा, सिमेंट, माती आणि सळई या सगळ्यांची कलिनातल्या लॅबमध्ये तपासणी करण्यात येणार आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञ येत्या आठवड्याभरात आपला अहवाल देणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 01:45 PM IST

इमारत दुर्घटनेला कारणीभूत बिल्डर अटकेत

06 एप्रिल

ठाणे जिल्ह्यात शिळफाटा इमारत दुर्घटनेप्रकरणात दोन्ही बिल्डरला अटक करण्यात आली आहेत. ठाणे क्राईम ब्रँचनं ही अटक केली. जमील कुरेशीला दिल्लीतून, तर सलीम शेखला ठाण्यातून अटक करण्यात आलीय. या इमारतीच्या बिल्डरच्या विरोधात अगोदरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही बिल्डर पैकी सलीम शेखला गुरूवारी क्राईम ब्रँचनं अटक केली. दुर्घटनास्थळावरचं मदतकार्य आज दुपारी एक वाजेपर्यंत सुरु होतं. तब्बल 42 तास चाललेल्या या बचावकामात 73 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यात 62 जण जखमी झालेत. जखमींवर ठाण्यातील शिवाजी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये 26 पुरुष, 20 महिला, 11 मुलं आणि 15 मुलींचा समावेश आहे. जी इमारत दुर्घटनाग्रस्त झालीय, तिचं साहित्य तपासणीसाठी पाठवण्यात आलंय. या इमारतीसाठी वापरण्यात आलेल्या विटा, सिमेंट, माती आणि सळई या सगळ्यांची कलिनातल्या लॅबमध्ये तपासणी करण्यात येणार आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञ येत्या आठवड्याभरात आपला अहवाल देणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2013 01:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close