S M L
  • अशीही होळी, पतीला खावा लागतो पत्नीकडून मार !

    Published On: Mar 27, 2013 10:59 AM IST | Updated On: Mar 27, 2013 10:59 AM IST

    सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद27 मार्चऔरंगाबाद : होळी म्हणजे रंगांचा उत्सव... होळीचं स्वरूप गेल्या काही वर्षांपासून बदललंय. पण मूळचा रंगारंग असलेला बंजारा समाज हा रंगाचा सण आपली संस्कृती जपत अगदी त्याच पारंपरिक रंगांरग पधदतीनंच साजरा करतोय. बंजारा समाजाच्या या होळीत पुरुषांनी वर्षभर केलेल्या चुकांची शिक्षा म्हणून त्यांना महिलांक़डून मार खावा लागतो.. तोही हसतहसत..बंजारा समाज तीन दिवस होळी साजरी केली जाते. तसंच होळी रात्री न पेटवता पहाटे पेटवली जाते. असं केल्यानं जनावरं वर्षभर आजारी पडत नाहीत असा समज आहे. शिक्षण आणि कामधंद्याच्या निमित्त हा समाज आता शहरांमध्ये विखुरलाय. पण होळीच्या सणासाठी तरुण-तरुणी आवर्जून गावाकडे येतात. निरनिराळे खेळ, पारंपारीक नाच-गाणी ही या होळीची वैशिष्ट्ये.. काळ बदलत असला तरी ती कायम राखण्याची धडपड दिसून येते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close